‘BharOS’ च्या टेस्टिंगनंतर समोर आले महत्त्वपूर्ण फीचर्स…

‘BharOS’ च्या टेस्टिंगनंतर समोर आले महत्त्वपूर्ण फीचर्स…
HIGHLIGHTS

भारताची स्वदेशी ऑपरेटिंग सिस्टीम 'BharOS' कोणत्याही डिफॉल्ट ऍप्सशिवाय सादर करण्यात आली आहे.

आता यूजर्सच्या फोनमध्ये असे ऍप्स नसतील जे ते वापरत नाहीत.

OS वर फक्त विश्वसनीय ऍप्सना परवानग्या मिळतात.

भारतातील पहिली स्वदेशी ऑपरेटिंग सिस्टीम येत आहे. 'BharOS'ची चाचणी घेण्यात आली असून OS चे काही फिचर्सही समोर आले आहेत. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास (IIT) येथे 'BharOS' ची चाचणी घेतली.

हे सुद्धा वाचा : Motorolaचे दोन बजेट स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

'BharOS' ही एक मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम आहे, जी भारत सरकारने गोपनीयता आणि सुरक्षितता लक्षात घेऊन तयार केली आहे. जी Google च्या Android वापरकर्त्यांसाठी आणि Apple च्या iOS वापरकर्त्यांसाठी आणली गेली आहे. चला जाणून घेऊया 'BharOS' बद्दल…

NO DEFAULT APPS (NDA) सह 'BHAROS'

भारताची स्वदेशी ऑपरेटिंग सिस्टीम 'BharOS' कोणत्याही डिफॉल्ट ऍप्सशिवाय सादर करण्यात आली आहे. आता यूजर्स फोनमध्ये फक्त तेच ऍप्स ठेवतील जे त्यांना वापरायचे आहेत.

वापरकर्त्यांच्या फोनमध्ये असे अ‍ॅप्स नसतात जे ते वापरत नाहीत किंवा ज्यांची माहिती वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही. अ‍ॅप्सवर दिलेल्या परवानगीवर वापरकर्ते त्यांचे संपूर्ण नियंत्रण ठेवण्यास सक्षम असतील.

NOTA डिव्हाइस सुरक्षित ठेवेल

  भारताची स्वदेशी ऑपरेटिंग सिस्टम 'नेटिव्ह ओव्हर द एअर' (NOTA) सह आली आहे. ऑपरेटिंग सिस्टीम तयार करणाऱ्या स्टार्टअपचे संचालक कार्तिक अय्यर यांच्या म्हणण्यानुसार, या विशेष अपडेटद्वारे डिव्हाइसची सुरक्षा पुष्टी झाली आहे. या अपडेटला फोनवर स्वतंत्रपणे इन्स्टॉल करण्याचीही गरज भासणार नाही, तर ते आधीच डिव्हाइससोबत येईल.

केवळ विश्वसनीय ऍप्सना मिळेल ऍक्सेस

  OS वर फक्त विश्वसनीय ऍप्सना परवानगी मिळते. 'BharOS' विश्वसनीय ऍप्सना केवळ संस्था-विशिष्ट खाजगी ऍप स्टोअर सेवा (PASS) द्वारे परवानग्या देते.

देशात BHAROS चा अवलंब आणि वापर वाढवण्यासाठी IIT मद्रास अनेक खाजगी उद्योग, सरकारी संस्था, धोरणात्मक संस्था आणि दूरसंचार सेवा प्रदात्यांसोबत मिळून काम करण्यास उत्सुक आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo