Lok Sabha Election 2024: घरबसल्या ऑनलाइन पहा तुमचे मतदान केंद्र कुठे असेल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप सोपी प्रक्रिया। Tech News
Lok Sabha Election 2024 निवडणुकीला या आठवड्यात सुरुवात होणार आहे.
निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिलपासून सुरू होणार आहे.
घरबसल्या ऑनलाईन तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवरून घरबसल्या मतदान केंद्राची माहिती मिळवता येईल.
Lok Sabha Election 2024 निवडणुकीला अवघ्या काही दिवसांत सुरुवात होत आहे. ही निवडणूक एकूण 7 टप्प्यात होणार आहे. तर निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिलपासून सुरू होणार आहे. मात्र, मतदानाला जाण्यापूर्वी तुमचे मतदान केंद्र कुठे आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. यामुळे तुमचा बराच वेळ वाचेल आणि तुम्ही वेळेवर मतदान करू शकता. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवरून घरबसल्या मतदान केंद्राची माहिती बघू शकता.
हे सुद्धा वाचा: Voter ID Card Download: तुमचे वोटर ID कार्ड हरवले आहे का? बघा नवीन ओळखपत्र डाउनलोड करण्याची सोपी प्रक्रिया। Tech News
वेबसाईटवरून पोलिंग बूथ सर्च करण्याची प्रक्रिया
- सर्व प्रथम भारतीय निवडणूक आयोगाची वेबसाइट उघडा. यासाठी तुम्ही https://voterportal.eci.gov.in/ या लिंकला भेट देता येईल.
- आता या साइटवर तुम्हाला तुमचा E-mail ID किंवा मोबाईल नंबर वापरून लॉग इन करावे लागेल.
- आता तुम्हाला ‘Find Polling Station’ या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसणारे काही महत्त्वाचे तपशील भरावे लागतील.
- अशाप्रकारे तुम्हाला तुमच्या पोलिंग बूथबद्दल माहिती मिळेल.
मोबाईल ऍपद्वारे पोलिंग बूथची माहिती मिळवा.
वर सांगितल्याप्रमाणे, वेबसाइट व्यतिरिक्त तुम्ही स्मार्टफोन ॲपद्वारे तुम्हाला मतदान केंद्राची म्हणजेच पोलिंग बूथची माहिती देखील मिळवता येईल. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये व्होटर हेल्पलाइन ॲप असणे आवश्यक आहे. हे ॲप Android आणि iOS दोन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता या ॲपवर मतदान केंद्र कसे शोधायचे ते बघुयात:
- सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये मतदार हेल्पलाइन ॲप (Voter App Download) डाउनलोड आणि इन्स्टॉल करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला ॲपमध्ये ‘find your polling station’ हा पर्याय दिसेल.
- येथे तुम्हाला राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ असे तपशील देखील द्यावे लागतील.
- आता सर्च वर क्लिक करून तुम्हाला तुमच्या जवळच्या मतदान केंद्राचा तपशील तुमच्या फोनवर सहज मिळवता येतील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile