Lok Sabha Election 2024: मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही? घरबसल्या ऑनलाईन तपासा, बघा सोपी प्रक्रिया। Tech News
लोकसभा निवडणूक 2024 निवडणुकीला येत्या 19 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.
मतदान करण्यासाठी तुमचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे.
तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे घरबसल्या पुढीलप्रमाणे तपासा.
नुकतेच Lok Sabha Election 2024 च्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. येत्या 19 एप्रिलपासून निवडणुकीला सुरुवात होत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, मतदान करण्यासाठी तुमचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. मात्र, अनेकदा असे होते की, मतदार यादीतून आपले नाव वगळल्याचे लोकांना माहिती नसते. त्यामुळे तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे तुम्ही आता घरबसल्या तपासू शकता.
हे सुद्धा वाचा: Loksabha Election 2024: Voter ID Card बनवण्यासाठी घरबसल्या Online अप्लाय करा, बघा सोपी प्रक्रिया
तुम्ही तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपच्या मदतीने घरबसल्या मतदार यादीत नाव आहे की नाही हे तपासू शकता. मतदार यादीत तुमचे नाव पाहण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे:
मतदार यादीतील आपले नाव ऑनलाइन कसे तपासावे?
- ऑनलाइन यादीत तुमचे नाव तपासण्यासाठी, सर्वप्रथम https://electoralsearch.eci.gov.in/ या URL वर जा.
- आता VOTERS’ SERVICE PORTAL तुमच्या समोर ओपन होईल. हे पोर्टल हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला तुमच्या सोयीनुसार भाषा निवडता येईल.
- येथे तीन ऑप्शन दिसतील. यामध्ये ”सर्च बाय डिटेल्स, EPIC द्वारे शोधा आणि मोबाइल ऑप्शनद्वारे शोधा”, असे पर्याय असतील.
- सर्च बाय डिटेल्स- ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमच्या राज्याचे नाव, तुमचे नाव आणि जन्मतारीख यासारखे तपशील भरून शोधावे लागेल.
- EPIC द्वारे शोधा- या ऑप्शनमध्ये तुम्ही तुमच्या मतदार कार्डवर दिलेल्या EPIC क्रमांकाद्वारे शोधू शकता.
- मोबाईलद्वारे शोधा- या पर्यायामध्ये तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि कॅप्चा कोड टाकून सर्च करावे लागेल. वेरिफिकेशनसाठी तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल.
वरीलपैकी कोणत्याही पर्यायाद्वारे तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत शोधू शकता. मात्र, परत एकदा लक्षात घ्या की, मतदान करण्यासाठी तुमचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. तुमचे नाव मतदार यादीत नसल्यास तुम्हाला मतदान करता येणार नाही.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile