digit zero1 awards

Lock Upp 2 : OTT वर येण्यास सज्ज, करण नाही तर ‘ही’ बिग बॉस विनर असेल जेलरच्या भूमिकेत ?

Lock Upp 2 : OTT वर येण्यास सज्ज, करण नाही तर ‘ही’ बिग बॉस विनर असेल जेलरच्या भूमिकेत ?
HIGHLIGHTS

कंगना रणौत Lock Upp 2द्वारे OTT वर कमबॅकसाठी सज्ज

यावेळी, बिग बॉस विजेती असेल का जेलरच्या भूमिकेत ?

जेलरच्या भूमिकेतून करण कुंद्राचा पत्ता कट

कंगना राणौत पुन्हा एकदा तिच्या रियालिटी शो Lock Upp 2द्वारे OTT वर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. या शोच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि ते लॉकअप 2 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा शो गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 

हे सुद्धा वाचा : ChatGPT करेल तुमच्या WhatsApp मॅसेजेसला रिप्लाय, कसे ते पहा ?

करण कुंद्राचा पत्ता कट 

लॉकअपमध्ये कंगना रणौतशिवाय करण कुंद्रा जेलरच्या भूमिकेत दिसला होता. जेव्हा तो शोमध्ये यायचा तेव्हा स्पर्धकांना फनी टास्क पाहायला मिळायचे. आता असे म्हटले जात आहे की, करण कुंद्रा दुसऱ्या सीझनमध्ये जेलरच्या भूमिकेत दिसणार नाही आणि त्याच्या जागी बिग बॉसची विजेती रुबिना दिलैक या शोचा भाग असेल, अशा बातम्या आहेत.
 

करण कुंद्रा नुकताच कलर्सच्या इश्क में घायाल या सिरीयलचा भाग बनला आहे. या शोमध्ये करण मुख्य भूमिकेत आहे आणि आता त्याची जागा रुबिना लॉकअपमध्ये घेणार असल्याचे बोलले जात आहे.काही काळापूर्वी आलेल्या अशा बातम्यांचे रुबिनाने खंडन केले असले तरी आता शो सुरू झाल्यानंतर पुन्हा जेलरसाठी अभिनेत्रीचे नाव चर्चेत आले आहे.

शो चा पहिला विजेता 

 लॉकअपचा पहिला सीझन स्टँड अप कॉमेडियन 'मुनव्वर फारुकी'ने जिंकला होता. या वेळी कंगना रणौतच्या लॉकअपमध्ये कोणते स्टार्स कैदी होतात, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
 

 

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo