सध्या सर्वच लोक फेसबुक, WhatsApp यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्स प्रायव्हसीसाठी पासवर्ड ठेवतात . बरेच लोक NordPass सारखे पासवर्ड मॅनेजर देखील वापरतात. आता नॉर्डपासने सर्वात वाईट पासवर्डची यादी जारी केली आहे. यादीनुसार, Password @123, Password 123, Password @1 आणि Password 1 हे सर्वात जास्त वापरले जाणारे पासवर्ड आहेत. बघुयात यादी…
हे सुद्धा वाचा : OPPO चा नवीन 5G स्मार्टफोन अखेर लाँच, कमी किमतीसह मिळतील अप्रतिम फीचर्स
अहवालानुसार, सुमारे 49 लाख लोक फक्त 'Password' वापरतात, त्यापैकी 34 लाख लोक भारतातील आहेत. भारतातील दुसरा सर्वाधिक पसंतीचा पासवर्ड 123456 आहे जो 1,66,757 वेळा वापरला गेला आहे. चौथ्या क्रमांकावर Bigbasket आहे, जो सुमारे 75,081 लोक वापरतात.
याशिवाय qwerty, anmol123 आणि googledummy सारखे पासवर्डही भारतात मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. Indya123 आणि India@123 इत्यादींसह अनेक लोक त्यांचे नाव पासवर्ड म्हणून वापरतात. NordPass अहवालानुसार, 73 टक्के लोक सर्वात सोपा 200 पासवर्ड वापरतात, तर 83 टक्के लोक एका सेकंदापेक्षा कमी वेळात ब्रेक करता येणारे पासवर्ड वापरतात.
त्यातही विशेष म्हणजे लोक iloveyou पासवर्ड देखील खूप वापरतात. अहवालात त्याचे रँकिंग 81 आहे. 3 टीबी पासवर्ड पाहिल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.