Valentine Gift Ideas: तुमच्या पार्टनरला गिफ्ट करा ‘हे’ Affordable गॅजेट्स, किंमत खूपच कमी। Tech News

Updated on 16-Feb-2024
HIGHLIGHTS

सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे आणि लवकरच Valentine Day देखील येणार आहे.

व्हॅलेंटाईन डे निमित्त पार्टनरला गिफ्ट करण्यासाठी अप्रतिम गॅजेट्स

हे सर्व गॅजेट 1000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध आहेत.

आपल्या सर्वांना फेब्रुवारी महिन्याची प्रतीक्षा आतुरतेने असते. कारण या महिन्यात सर्व प्रेमवीर Valentine Week साजरा करून आपल्या जोडीदाराप्रति आपले प्रेम व्यक्त करतात. सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे आणि लवकरच Valentine Day देखील येणार आहे. या विशेष प्रसंगी तुम्ही देखील तुमच्या पार्टनरला गिफ्ट देणाऱ्या विचार नक्कीच केला असेल. जर तुम्हाला व्हॅलेंटाईन डे निमित्त तुमच्या पार्टनरला काय गिफ्ट करावे हे कळत नसेल तर काळजी करू नका. कारण या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला कमी किमतीत येणारे अप्रतिम Gadgets सांगणार आहोत, जे तुम्ही येत्या व्हॅलेंटाईन तुमच्या पार्टनरला गिफ्ट करू शकता.

Boult Audio Z20 Truly Wireless in Ear Earbuds

Boult Audio Z20 Truly Wireless in Ear Earbuds सध्या Amazon वरून 999 रुपयांना 82% सूट ऑफरसह खरेदी केले जाऊ शकतात. सिंगल चार्जवर हे बड्स 51 तास टिकतील. यामध्ये ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन सपोर्ट उपलब्ध आहे. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसाठी, यात ब्लूटूथ 5.2 साठी समर्थन आहे. हे तुमच्या बॉयफ्रेंडसाठी उत्तम गिफ्टिंग ऑप्शन आहे. येथून खरेदी करा

Noise ColorFit Pulse Smartwatch

Noise ColorFit Pulse स्मार्टवॉच Amazon वरून फक्त 999 रुपयांना खरेदी करता येईल. या वॉचमध्ये 1.4 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हे उपकरण अनेक हेल्थ फीचर्ससह सुसज्ज आहे. या डिवाइसची बॅटरी लाईफ देखील उत्कृष्ट आहे. ही स्मार्टवॉच एका चार्जवर तब्बल 10 दिवस टिकण्याची क्षमता ठेवते. तुम्ही तुमच्या प्रियकर/प्रेयसीला ही वॉच गिफ्ट करून त्यांना आरोग्याची काळजी घेण्यास उद्युक्त करू शकता. येथून खरेदी करा

Milton Swiftron Stainless Steel Electric Lunch Box Set

मिल्टन स्विफ्ट्रॉन स्टेनलेस स्टील इलेक्ट्रिकलंच बॉक्स सेट Amazon वरून 999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. हा लंच बॉक्स 2 कंटेनरसह येतो. जर तुम्हाला थंड जेवण करायला अजिबात आवडत नाही तर, आम्ही तुम्हाला सांगतो की, हे लंच बॉक्स मायक्रोवेव्ह सुरक्षिततेसह येतात. हे इलेक्ट्रिक कॉर्डसह येते, ज्याच्या मदतीने तुम्ही लंच बॉक्समध्ये दुपारचे जेवण सहज गरम करू शकता. जर तुम्ही ऑफिसला जाणाऱ्या तुमच्या पार्टनरसाठी स्पेशल गिफ्ट शोधत असाल तर, हा इलेक्ट्रिक लंच बॉक्स तुमच्यासाठी योग्य आहे. येथून खरेदी करा

Zebronics Zeb-Bang Pro Bluetooth Wireless On Ear Headphones

Zebronics Zeb-Bang Pro ब्लूटूथ वायरलेस ऑन इयर हेडफोन्स Amazon वरून 799 रुपयांना 68% सूट देऊन खरेदी केले जाऊ शकतात. या ब्लूटूथ हेडफोनमध्ये 40mm ड्रायव्हर्स आहेत. स्मार्टफोन, टॅबलेट आणि लॅपटॉपसह हे हेडफोन्स वापरता येतात. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :