खाली दिलेल्या प्रोसेसनुसार आजच PAN -Aadhar लिंक करा.
अन्यथा 1,000 रुपये दंड भरावा लागेल.
जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला हे माहित असेलंच की, 31 मार्च 2023 पर्यंत सर्व नागरिकांना त्यांचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करावे लागेल. सरकारने या मुदतीत पॅनकार्ड असलेल्या सर्व लोकांना त्यांचे PAN कार्ड -Aadhar कार्डशी लिंक करणे बंधनकारक केले आहे.
जर तुम्ही अजून PAN -Aadhar लिंक केले नसेल तर हे काम तुम्ही आजच करा. अंतिम मुदत पूर्ण झाल्यानंतर 1 एप्रिल 2023 पासून पॅन कार्ड निष्क्रिय होतील. त्यानंतर, तुम्हाला 1,000 रुपये दंड भरावा लागेल.
पॅन-आधार लिंक कसे कराल ?
जर तुम्ही अजून पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नसेल तर, खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
– सर्वप्रथम तुम्हाला https://www.incometax.gov.in/iec/foportal/ वर जावे लागेल.
– त्यानंतर तुम्हाला Quick Links विभागात जाऊन Link Aadhaar वर क्लिक करावे लागेल.
– त्यानंतर दुसऱ्या पेजवर जा आणि तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड तपशील टाका.
– त्यानंतर तुम्हाला 'I validate my Aadhaar Details' यावर चेक मार्क करावा लागेल.
– त्यानंतर Continue वर क्लिक करा.
– तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल, तो एंटर करा. त्यानंतर Validate वर क्लिक करा.
– त्यानंतर पेनल्टी भरा. त्यानंतर तुमचा पॅन-आधार लिंक होईल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.