सरकारने आता पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची तारीख 31 मार्च 2022 वरून 31 मार्च 2023 पर्यंत वाढवली आहे. मात्र, या नव्या तारखेसह एक इशाराही देण्यात आला आहे. 1 एप्रिल 2022 पासून तुम्हाला पॅन आणि आधार कार्ड लिंक करायचे असल्यास तुम्हाला एक विशिष्ट शुल्क भरावे लागेल. जर तुम्ही तुमचे आधार आणि पॅन कार्ड 30 जून 2022 पूर्वी लिंक केले तर 500 रुपये शुल्क आकारले जाते. परंतु 1 जुलै 2022 पासून ते दुप्पट केले जाईल. म्हणजेच या तारखेनंतर तुम्हाला अतिरिक्त 500 रुपये द्यावे लागतील, म्हणजेच तुम्हाला डबल पेनल्टी द्यावी लागेल.
आधार-पॅन लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 1 जुलैपासून तुम्हाला 1,000 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. करदात्यांना 1 एप्रिल 2022 पासून तीन महिन्यांसाठी 500 रुपये आणि त्यानंतर 1000 रुपये, त्यांचे आधार पॅनशी लिंक करताना शुल्क भरावे लागणार आहे.
हे सुद्धा वाचा: OnePlus चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन येतोय, 50MP कॅमेरासह मिळेल 5000mAh ची बॅटरी
जर तुम्ही आधार कार्ड पॅन लिंक केले नाही, तर तुमचे पॅन कार्ड एका कालावधीनंतर निष्क्रिय होईल. जेथे पॅन क्रमांक अनिवार्य असेल, तेथे आर्थिक व्यवहार करण्यासाठी तुम्ही तुमचे पॅन कार्ड वापरू शकणार नाही. मात्र, एकदा तुम्ही आधार कार्डसोबत पॅन लिंक केल्यानंतर ते पुन्हा सक्रिय होईल. दिलेल्या मुदतीत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक न केल्यास 10,000 रुपयांचा दंडही सरकार आकारणार आहे.
आधार कार्ड हा भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) द्वारे जारी केलेला 12 अंकी ओळख क्रमांक आहे. हे कार्ड भारतीय नागरिकांसाठी ओळखीचा पुरावा आणि रहिवासी पुरावा म्हणून काम करते. पॅन किंवा स्थायी ओळख क्रमांक हा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDTच्या देखरेखीखाली भारताच्या आयकर विभागाने जारी केलेला दहा-अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांक आहे. आयकर रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. याबरोबरच, पॅन कार्ड ओळखीचा पुरावा म्हणूनही काम करतो.
तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे, ही अतिशय सोपी प्रक्रिया आहे. यासाठी सरकारने अनेक पद्धती उपलब्ध करून दिल्या आहेत.
-नवीन आयकर वेबसाइटला https://www.incometax.gov.in/iec/foportal/ भेट देऊन पॅन-आधार लिंक करता येईल.
– त्यानंतर, SMS द्वारे देखील तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करता येईल. त्यासाठी तुम्हाला UIDPAN<12 अंकी आधार> <10 अंकी PAN> फॉरमॅटमध्ये मॅसेज टाइप करावा लागेल. यानंतर, 567678 किंवा 56161 वर SMS पाठवा.
– तुम्हाला पॅन सेवा प्रदाता NSDL कडे जाऊन आवश्यक तो फॉर्म भरून देखील ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.
तुम्हाला तुमच्या पॅन-आधार लिंकचे स्टेटस तपासावे लागेल. तुमचा पॅन तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तपासण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
-ई-फायलिंग प्राप्तिकर विभागाच्या पृष्ठावर जा. म्हणजे https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/AadhaarPreloginStatus.html.
– तुमचा पॅन क्रमांक प्रविष्ट करा.
– तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा.
– 'व्यू लिंक आधार स्टेटस' बटणवर क्लिक करा.
– तुमचे आधार पॅन लिंक स्टेटस स्क्रीनवर प्रदर्शित होईल.