Liger BO Collection Day 1 : चित्रपटाची सुरुवात उत्तम, परंतु हिंदी बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी नाही

Updated on 26-Aug-2022
HIGHLIGHTS

विजय देवरकोंडाच्या पहिल्या हिंदी चित्रपटाची सुरुवात उत्तम

मात्र, हिंदीमध्ये फारशी कमाल दिसली नाही.

बघा, चित्रपटाबद्दल काय म्हणाला अभिनेता...

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे स्टारर Liger हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात विजय व्यतिरिक्त अनन्या, रम्या कृष्णन, रोनित रॉय यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसेच, फायटर माइक टायसनचा चित्रपटात कॅमिओ आहे. या चित्रपटाद्वारे विजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. विजयच्या अभिनयाचे कौतुक होत असले तरी तो चित्रपटाच्या कथेबद्दल काही विशेष सांगत नाहीये. तसे, हिंदीपेक्षा साऊथमध्ये चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, आता या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनही आले आहे.

हे सुद्धा वाचा : SAMSUNG च्या नुकत्याच लाँच झालेल्या इयरबड्सवर मिळणार मोठी ऑफर, जाणून घ्या डील

रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 21-23 कोटींचा गल्ला जमवला आहे. एकट्या तेलुगूमध्ये या चित्रपटाने जवळपास 15 कोटींची कमाई केली आहे. हिंदीत चित्रपटाचे कलेक्शन काही खास नव्हते. हा एक हिंदी चित्रपट आहे, पण इथे चित्रपटाने फारशी कमाई केली नाही.

चित्रपट पुरी जगन्नाथ दिग्दर्शित स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा त्याला खूप पसंती मिळाली. मात्र या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये.

चित्रपटाबद्दल काय म्हणाला अभिनेता…

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी विजयला विचारण्यात आले की, जर त्याच्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही तर तू काय करशील? यावर विजय म्हणाला, "आम्ही खूप मेहनत घेऊन हा चित्रपट बनवला आहे. मला आशा आहे की हा चित्रपट सर्वांना आवडेल. मी काही चूक केली नाही, मग मी कशाला घाबरू? आईचे आशीर्वाद, लोकांचे प्रेम, देवाचा हात, आतील आग. कोण थांबवणार, बघून घेऊ."

त्याबरोबरच, अभिनेता आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाचे समर्थन केल्यावर विजयच्या चित्रपटावरही बहिष्कार टाकला गेला होता.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :