हा टॅबलेट क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 615 ऑक्टाकोर प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे.
कोरियाची मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी LG ने बाजारात आपला नवीन टॅबलेट LG G Pad II 8.3 LTE सादर केला आहे. हा नवीन टॅबलेट कंपनीद्वारा २०१३ मध्ये सादर केलेल्या टॅबलेट LG G Pad 8.3 चे अपडेटेड व्हर्जन आहे.
ह्या टॅबलेटच्या वैशिष्ट्याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 8.3 इंचाची पुर्ण HD IPS डिस्प्ले आहे. त्याचबरोबर हा टॅबलेट क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 615 ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. त्याबरोबर ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे.
त्याशिवाय ह्या टॅबलेटमध्ये 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. हा अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1.1 वर काम करतो.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात LTE सपोर्टशिवाय ब्लूटुथ, वायफाय, USB सारखे फीचर्स दिले आहेत. कंपनीने ह्याला ब्राउन गोल्ड रंगात लाँच करत आहे. कंपनीने सध्यातरी ह्याच्या किंमत आणि ह्याला दुस-या देशात कशी लाँच करेल याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.