LG G पॅड III 8.0 लाँच, 16GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज

Updated on 30-May-2016
HIGHLIGHTS

ह्या डिवाइसमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे, ह्या डिवाइस स्टोरेजला 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. त्याचबरोबर ह्यात 5 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरासुद्धा दिला गेला आहे.

मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी LG ने बाजारात आपला नवीन टॅबलेट G पॅड III 8.0 लाँच केला आहे. हा डिवाइस ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात 8 इंचाची डिस्प्लेसुद्धा दिली गेली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1920×1200 पिक्सेल आहे.
 

ह्या डिवाइसमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे, ह्या डिवाइसचे स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येऊ शकते. त्याचबरोबर फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरासुद्धा दिला आहे. ह्या डिवाइसचा आकार 210.7×124.1×7.9mm आणि वजन 309 ग्रॅम आहे. हा टॅबलेट अॅनड्रॉईड 6.0.1 मार्शमॅलोवर काम करतो. ह्या डिवाइसला सध्यातरी कॅनडामध्ये खरेदी केले जाऊ शकते.

हेदेखील वाचा – ओप्पो लवकरच आणणार आपला फोल्डेबल स्मार्टफोन
हेदेखील वाचा – HTC वन M9 प्लस कॅमेरा एडिशन लाँच, ह्यात आहे उत्कृष्ट कॅमेरा फिचर्स

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :