दमदार बॅटरीसह LENOVO TAB P12 PRO भारतात लाँच, AMOLED डिस्प्लेसह मिळतील अनेक फीचर्स

दमदार बॅटरीसह LENOVO TAB P12 PRO भारतात लाँच, AMOLED डिस्प्लेसह मिळतील अनेक फीचर्स
HIGHLIGHTS

LENOVO TAB P12 PRO भारतात लाँच

या लेनोवो टॅबची किंमत एकूण 69,999 रुपये

दमदार बॅटरी, AMOLED डिस्प्लेसह आकर्षक फीचर्स उपलब्ध

LENOVO TAB P12 PRO भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे. हा फ्लॅगशिप ANDROID टॅबलेट GALAXY TAB S8 सिरीज आणि APPLE IPAD शी स्पर्धा करण्यासाठी भारतात लाँच करण्यात आला आहे. महत्त्वाच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, हा डिवाइस स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, AMOLED स्क्रीन आणि मोठ्या बॅटरीसह सादर करण्यात आला आहे. चला तर जाणून घेऊयात टॅबची किंमत आणि जबरदस्त फीचर्स… 

LENOVO TAB P12 PROची  किंमत

या लेनोवो टॅबची किंमत 69,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ग्राहक हा डिवाइस कंपनीच्या अधिकृत साईट आणि कंपनीच्या खास स्टोअर व्यतिरिक्त AMAZON वरून खरेदी करू शकतील.

हे सुद्धा वाचा : इंटरनेट स्पीड होईल सुपरफास्ट, फक्त फोनच्या सेटिंग्जमध्ये करा 'हे' महत्त्वाचे बदल

Lenovo Tab P12 Proचे स्पेसिफिकेशन्स 

 या टॅबमध्ये 12.6-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. जो 2560 x 1600 पिक्सेल रिझोल्यूशन ऑफर करतो. या डिवाइसमध्ये 400 nits पीक ब्राइटनेस आहे. तसेच, यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसाठी वापरले गेले आहे. प्रोसेसर म्हणून, यात स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी Adreno 650 GPU देण्यात आला आहे.

टॅबमध्ये 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे. तसेच, यात टाइम ऑफ फ्लाइट कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहे. 5-मेगापिक्सलच्या सेकंडरी कॅमेरा सेन्सरसह 13-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेंसर बॅक पॅनलवर देण्यात आला आहे. तसेच, यात 30 W फास्ट चार्ज सपोर्टसह 10200 mAh बॅटरी देण्यात आली आहे. डिवाइसच्या इतर फीचर्समध्ये, डॉल्बी ATMOS, ड्युअल माइक, साइड माउंट फिंगरप्रिंट सेन्सर, क्वाड-स्पीकर सेटअप यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo