भारीच की! 10,200mAh बॅटरीसह Lenovo Tab P12 भारतात लाँच, मिळतील ‘हे’ शक्तिशाली फीचर्स
Lenovo Tab P12 भारतीय बाजारात अखेर लाँच झाला आहे.
Lenovo Tab P12 ची किंमत कंपनीने भारतात 34,999 रुपयांना लाँच केला आहे.
नवीन टॅबलेट MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर देण्यात आला आहे.
Lenovo Tab P12 भारतीय बाजारात अखेर लाँच झाला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने हे मॉडेल गेल्या महिन्यात युरोपमध्ये सादर केले होते. आता अखेर Lenovo चा हा लेटेस्ट टॅबलेट भारतात दाखल झाला आहे. विशेष म्हणजे हा टॅबलेट स्टायलस पेन सपोर्टसह येतो. तुम्हाला टॅबलेटमध्ये पॉवरफुल प्रोसेसर आणि पावरफुल बॅटरी मिळेल. नवीन टॅबलेटची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बघुयात.
Lenovo Tab P12 ची किमंत आणि उपलब्धता
Lenovo Tab P12 ची किंमत कंपनीने भारतात 34,999 रुपयांना लाँच केला आहे. हा टॅबलेट फक्त एकाच कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असणार आहे, म्हणजेच Storm Grey कलरमध्ये हा फोन तुम्हाला खरेदी करता येईल. टॅबलेटची सेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर मर्यादित वेळेच्या विशेष ऑफरसह सुरू होणार आहे.
Lenovo Tab P12
Lenovo Tab P12 मध्ये 12.7-इंच लांबीचा LTPS LCD डिस्प्ले आहे. या प्रकारचा डिस्प्ले स्टॅंडर्ड LCD च्या तुलनेत वेगवान आणि अधिक इंटीग्रेटेड डिस्प्ले प्रदान करतो. त्याची पीक ब्राइटनेस 400 निट्स आहे आणि पिक्सेल रिझोल्यूशन 2944×1840 आहे. डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह आणला गेला आहे. JBL चा क्वाड स्पीकर सेटअप ऑडिओसाठी टॅबलेटमध्ये उपलब्ध आहे.
नवीन टॅबलेट MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरसह 8GB LPDDR4X रॅम आणि 256GB UFS 2.2 स्टोरेजद्वारे समर्थित आहे. मात्र, इंटर्नल स्टोरेज मायक्रो SD कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते. Dimensity 7050 CPU मल्टी-कोर कार्यप्रदर्शन आणि मल्टीमीडिया क्षमतांमध्ये उत्कृष्ट आहे, जे AI आणि मल्टीमीडिया कार्यांना प्राधान्य देणाऱ्या वापरकर्त्यांसाठी एक आकर्षक पर्याय बनवते.
यात 10,200mAh बॅटरी आहे, जी मानक चार्जिंग सपोर्टसह येते. आम्ही तुम्हाला सांगूतो की, एकदा टॅब्लेट पूर्ण चार्ज झाला की तो 10 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक ऑफर करतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी टॅबलेटच्या पुढील बाजूस 13MP कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. हा कॅमेरा ब्राईट आणि हाय डेफिनेशन इमेजेस देतो. तर टॅबलेट मागील बाजूस 8MP कॅमेरा आणि LED फ्लॅश आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile