Lenovo चा पहिला प्रीमियम टॅबलेट लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Lenovo Tab P11 5G प्रीमियम टॅबलेट लाँच
6 GB रॅम + 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये
100 टक्के चार्जिंगमध्ये टॅब 12 तास चालवता येतो.
स्मार्टफोन ब्रँड Lenovo ने आपला पहिला प्रीमियम टॅबलेट Tab P11 5G आज लाँच करण्यात आला आहे. हा टॅबलेट 5G कनेक्टिव्हिटीसह भारतात सादर करण्यात आला आहे. Tab P11 ची सुरुवातीची किंमत 29,999 रुपये आहे. टॅबमध्ये 256GB पर्यंत स्टोरेज आणि 8GB RAM साठी सपोर्ट आहे. तर, Qualcomm Snapdragon 750G 5G प्रोसेसर यात उपलब्ध आहे. फोनमध्ये 2K IPS टचस्क्रीन आणि डॉल्बी व्हिजन सपोर्ट आहे. चला टॅबच्या इतर फीचर्स आणि किंमतीबद्दल जाणून घेऊया…
हे सुद्धा वाचा : अप्रतिम ऑफर ! OnePlus चा सर्वात स्वस्त 5G फोन, फक्त 3,749 रुपयांमध्ये खरेदी करा
Lenovo Tab P11 5G चे स्पेसिफिकेशन्स
Lenovo Tab P11 5G ला 11-इंच 2K रिजोल्यूशन IPS LCD स्क्रीन मिळते, जी 400 nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करते. यात JBL चे चार-स्पीकर आहेत, जे डॉल्बी ऍटमॉस आणि डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करतात. या टॅबलेटला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G 5G मोबाइल प्रोसेसर आणि इंटिग्रेटेड Adreno 619 GPU ने सपोर्ट केला आहे. Lenovo Tab P11 5G मध्ये 8 GB पर्यंत RAM आणि 256 GB पर्यंत स्टोरेजसाठी समर्थन आहे. मायक्रो SD कार्डच्या मदतीने स्टोरेज 512 GB पर्यंत वाढवता येते.
Lenovo Tab P11 5G च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर यात 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. तर, समोर 8-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. कॅमेरासह 2x झूमसाठी समर्थन आहे. टॅबसह 7,700 mAh बॅटरी उपलब्ध आहे, ज्यासह 10 W चार्जिंग उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की, 100 टक्के चार्जिंगमध्ये टॅब 12 तास चालवता येतो.
Lenovo Tab P11 5G किंमत
टॅबलेटच्या 6 GB रॅम + 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आणि 8 GB रॅम + 256 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 34,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा टॅबलेट Lenovo ऑनलाइन स्टोअर आणि Amazon India वर Storm Grey, Moon White आणि Modernist Tail या कलरमध्ये उपलब्ध आहे. Lenovo टॅबलेटवर एक वर्षाची कॅरी-इन वॉरंटी देत आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile