Lenovo ने भारतात आपला नवीन टॅबलेट Lenovo Tab M9 लाँच केला आहे. त्याची LTE मोबाईल कनेक्टिव्हिटी आणि फक्त Wi-Fi कनेक्ट मॉडेल बाजारात लाँच करण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे टॅबलेट अगदी ग्राहकांच्या बजेट किमतीत म्हणजेच 12,999 रुपयांमध्ये आणला गेला आहे. जे ग्राहक बजेट रेंज लेटेस्ट टॅबलेट शोधत होते, त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.
कंपनीने Lenovo Tab M9 टॅबच्या 3GB RAM + 32GB स्टोरेज Wi-Fi मॉडेलची किंमत 12,999 रुपये आहे. टॅबच्या 4GB रॅम + 64GB स्टोरेज Wi-Fi मॉडेलची किंमत 13,999 रुपये आहे. तर, 4G कनेक्टिव्हिटीसह 4GB RAM + 64 GB स्टोरेजची किंमत 15,499 रुपये आहे. या तीन व्हेरिएंटमध्ये हा टॅबलेट लाँच करण्यात आला आहे.
हा टॅबलेट Flipkart, Amazon आणि Reliance डिजिटल आणि क्रोमासारख्या ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. याशिवाय पुढील दोन दिवसांनी म्हणजे 1 जूनपासून या टॅबलेटची विक्री सुरू होणार आहे. हा डिवाइस फ्रॉस्ट ब्लू आणि स्टॉर्म ग्रे या दोन कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल.
Lenovo Tab M9 Tab मध्ये 9-इंच लांबीचा HD IPS डिस्प्ले आहे. टॅबमध्ये ऑक्टा कोअर मीडियाटेक हेलिओ जी80 प्रोसेसर देण्यात आला आहे. डिव्हाइसला 4GB पर्यंत LPDDR4X RAM + 64GB पर्यंत स्टोरेज मिळणार आहे. मायक्रो SD कार्डद्वारे स्टोरेज देखील वाढवता येणार आहे, यासाठी यामध्ये एक स्लॉट देखील देण्यात आला आहे. मायक्रो SD कार्डद्वारे स्टोरेज 128GB पर्यंत वाढवता येईल.
ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर हा टॅब Android 12 वर कार्य करतो. फोटोग्राफीसाठी टॅबलेटमध्ये 8MP चा रियर कॅमेरा आणि 2MP चा फ्रंट कॅमेरा आहे. टॅबमध्ये दीर्घकाळ टिकणारी 5100mAh बॅटरी आहे, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. ही बॅटरी 13 तासांचा व्हिडिओ एक्सपेरियन्स देते, असा कंपनीकडून दावा करण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे कंपनीने टॅबमध्ये वाचण्यासाठी इमर्सिव रीडिंग मोडही दिला आहे. यामुळे वापरकर्त्यांचा रिडींग एक्सपेरियंस अधिक उत्तम होणार आहे.