11 इंच लांबीच्या डिस्प्लेसह Lenovo Tab M11 टॅबलेट भारतात लाँच, आजपासून सुरु होणार विक्री। Tech News 

11 इंच लांबीच्या डिस्प्लेसह Lenovo Tab M11 टॅबलेट भारतात लाँच, आजपासून सुरु होणार विक्री। Tech News 
HIGHLIGHTS

Lenovo Tab M11 अखेर भारतीय बाजारात लाँच झाला आहे.

Lenovo कंपनीने 18,000 रुपयांच्या किंमतीत Lenovo Tab M11 सादर केला आहे.

हा टॅब एका चार्जवर 10 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक प्रदान करतो.

Lenovo Tab M11 अखेर भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने याआधी CES 2024 मध्ये हा टॅब सादर केला होता. आता हे टॅबलेट अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या Lenovo टॅबमध्ये तुम्हाला 11 इंच लांबीचा LCD डिस्प्ले मिळेल. याशिवाय, टॅब MediaTek Helio G8 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, टॅबमध्ये 13MP रियर कॅमेरा आहे. या टॅबची बॅटरी 7,040mAh आहे. चला तर मग जाणून घेऊयात नव्या Lenovo टॅबची किंमत, उपलब्धता आणि सर्व स्पेसिफिकेशन्स-

हे सुद्धा वाचा: 108MP कॅमेरासह येणाऱ्या OnePlus स्मार्टफोनवर अप्रतिम Discount ऑफर उपलब्ध, किंमत 20 हजार रुपयांअंतर्गत। Tech News

Lenovo Tab M11 India launch teased: 11-inch display, 7040mAh battery & more revealed

Lenovo Tab M11 ची भारतीय किंमत आणि उपलब्धता

Lenovo कंपनीने 18,000 रुपयांच्या किंमतीत Lenovo Tab M11 सादर केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा लेनोवो टॅब पेनसह येतो, ज्याची किंमत 22,000 रुपये आहे. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या टॅबची प्री-ऑर्डर Amazon India आणि Lenovo वर सुरु झाली आहे. या फोनची विक्री आज 27 मार्चपासून उपलब्ध होईल. या टॅबमध्ये लुना ग्रे आणि सीफोम ग्रीन हे दोन कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत.

Lenovo Tab M11 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Lenovo Tab M11 मध्ये 11-इंच लांबीचा IPS LCD डिस्प्ले आहे, डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. स्पीड आणि मल्टी टास्किंगसाठी, हा टॅब MediaTek Helio G88 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. हा टॅब Android 13 वर काम करतो. पाण्याच्या प्रोटेक्शनसाठी या टॅबला IP52 रेटिंग देण्यात आली आहे. त्याबरोबरच, सुरक्षेसाठी टॅबमध्ये फेस अनलॉक सिस्टम देखील देण्यात आली आहे.

Lenovo Tab M11 India launch teased: 11-inch display, 7040mAh battery & more revealed

फोटोग्राफीसाठी नव्या Lenovo Tab मध्ये 13MP रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर, यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, टॅबमध्ये 7,040mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. तर, त्याच्यासोबत 10W ॲडॉप्टर देण्यात आला आहे. हा टॅब एका चार्जवर 10 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक प्रदान करतो, असा कंपनीचा दावा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo