7700mAh बॅटरी आणि 11-इंच डिस्प्लेसह येणार Lenovo चा कूल टॅब, जाणून घ्या किंमत

7700mAh बॅटरी आणि 11-इंच डिस्प्लेसह येणार Lenovo चा कूल टॅब, जाणून घ्या किंमत
HIGHLIGHTS

Lenovo Tab P11 Plus लवकरच भारतात होणार लाँच

कंपनीच्या वेबसाइटशिवाय टॅबची विक्री Amazon India वर होणार असल्याची पुष्टी

टॉप-एंड वेरिएंटची किंमत 25,999 रुपये असण्याची शक्यता

Lenovo आपला नवीन टॅब Lenovo Tab P11 Plus भारतात लाँच करणार आहे. लाँच होण्यापूर्वी या आगामी टॅबचे लँडिंग पेज Amazon India वर लाईव्ह झाले आहे. यासोबतच कंपनीच्या वेबसाइटशिवाय टॅबची विक्री Amazon India वर होणार असल्याची पुष्टी झाली आहे. लाईव्ह झालेल्या लँडिंग पेजनुसार, या टॅबमध्ये 7700mAh बॅटरी, 11-इंच 2K IPS LCD डिस्प्ले आणि MediaTek Helio G90T चिपसेट असेल. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि Amazon India नुसार, त्याच्या टॉप-एंड वेरिएंट म्हणजेच 6GB + 128GB ची किंमत 25,999 रुपये असेल.

हे सुद्धा वाचा : तुमच्या बजेटमध्ये स्मार्टफोन हवंय ? बघा 10 हजार रुपयांपर्यंत मिळणाऱ्या जबरदस्त स्मार्टफोन्सची यादी

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

टॅबमध्ये, कंपनी 1200×2000 पिक्सेल रिझोल्यूशनसह 11-इंच 2K LCD डिस्प्ले देत आहे. या डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस 400 nits आहे. टॅब थिक बेझल आणि टॉप-सेंटर पंच-होल डिझाइनसह येईल. हा Lenovo टॅब 6 GB पर्यंत RAM आणि 128 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी त्यात MediaTek Helio G90T चिपसेट देत आहे.

टॅबच्या मागील बाजूस, तुम्हाला LED फ्लॅशसह 13-मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल. तसेच, कंपनी सेल्फीसाठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देणार आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर हा टॅब 7700mAh बॅटरीने सुसज्ज आहे. ही बॅटरी 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

हा Lenovo टॅब Android 11 OS वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G, Wi-Fi 5, Bluetooth 5.1, GPS आणि USB-C पोर्ट सारखे पर्याय देण्यात आले आहेत. हा Lenovo टॅब प्लॅटिनम ग्रे, व्हाइट आणि ग्रीन या तीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध होणार आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo