Lenovo ने आपला नवीन Android टॅबलेट Tab M10 Plus (3rd जनरेशन) भारतात लाँच केला आहे. नवीन टॅबलेट मल्टीमीडिया वापरासाठी तयार करण्यात आला आहे. हा टॅबलेट 10.6-इंच लांबीच्या डिस्प्लेसह येतो आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेटद्वारे समर्थित आहे. 600-सिरीज चिपसेटसह, हा टॅबलेट मध्यम गेमर्ससाठी देखील एक उत्तम पर्याय असेल. टॅबची सुरुवातीची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी आहे आणि असा दावा केला जात आहे की Google Kids Space ला सपोर्ट करणारा हा भारतातील पहिला टॅब आहे.
हे सुद्धा वाचा : आकर्षक लुकसह Redmi Pad 4G ची लाँच डेट जाहीर, 'या' फीचर्ससह लवकरच होणार लाँच
Lenovo Tab M10 Plus (3rd Gen) ची भारतातील किंमत केवळ WiFi मॉडेलसाठी 19,999 रुपये आणि LTE व्हेरिएंटसाठी 21,999 रुपये आहे. टॅबलेट आता Lenovo.com आणि Amazon.in वर खरेदीसाठी उपलब्ध आहे. ते लवकरच ऑफलाइन रिटेल चॅनेलवरही उपलब्ध होईल.
Lenovo Tab M10 Plus (3rd Generation) हा Google Kids Space ला सपोर्ट करणारा भारतातील पहिला टॅब आहे. Google Kids Space हा मुलांसाठी डेडिकेटेड मोड आहे जो मुलांना डिस्कवर, क्रिएट आणि ग्रो करण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. जेव्हा लहान मूले Kids Space उघडतो, तेव्हा त्यांना पुस्तके, ऍप्स आणि व्हिडिओंच्या स्वरूपात निवडलेल्या सामग्रीची लायब्ररी दिली जाते. टॅबलेट M10 Plus (3rd Gen) साठी Lenovo Precision Pen 2 ला देखील सपोर्ट करतो. टॅब डॉल्बी ATMOS तंत्रज्ञानासह ऑप्टिमाइझ केलेल्या 4 स्टीरिओ स्पीकरमधून मजबूत आवाज निर्माण करतो.
Lenovo Tab M10 Plus (3rd Gen) मध्ये ड्युअल-टोन थीम आहे. हे स्टॉर्म ग्रे आणि फ्रॉस्ट ब्लू कलरमध्ये येतो. लेनोवो टॅबला ऑप्टिमाइझ्ड रीडिंग मोड सेटिंग्ज आणि ऑप्शनल फोलिओ केस मिळतात. टॅबमध्ये 10.61-इंच 2K IPS LCD डिस्प्ले, 10-पॉइंट मल्टी-टच आणि 400 nits ब्राइटनेस आहे. टॅब्लेटचा डिस्प्ले 2000×1200 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. टॅब्लेट डिस्प्लेला TÜV रेनलँड लो ब्लू लाइट प्रमाणपत्र मिळते, जे हानिकारक ब्लु लाईट कमी करण्यात मदत करते. टॅब M10 प्लस (3rd जनरेशन) ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह समर्थित आहे.