लेनोवोने थिंकपॅड X1 टॅबलेटची जाडी केवळ 0.33 इंच आहे आणि कंपनीचा दावा आहे की हा जगातील सर्वात बारीक टॅबलेट आहे. कंपनीनुसार टॅबलेट मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो 3 आणि प्रो 4 पेक्षाही पातळ आहे.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी लेनोवोने आपला नवीन टॅबलेट थिंकपॅड X1 सादर केला. कंपनीने आपल्या ह्या टॅबलेटला CES 2016 मध्ये प्री-इव्हेंट दरम्यान सादर केले. त्याचबरोबर कंपनीने लेनोवो थिंकपॅड X1 योगा टॅबलेटसुद्धा लाँच केला आहे.
लेनोवो थिंकपॅड X1 फेब्रुवारीपासून उपलब्ध होईल. ह्याची किंमत $899 (जवळपास ६०,००० रुपये) ठेवण्यात आली आहे. लेनोवो थिंकपॅड X1 टॅबलेटची जाडी केवळ 0.33 इंच आहे आणि कंपनीचा दावा आहे की हा जगातील सर्वात बारीक टॅबलेट आहे. कंपनीनुसार टॅबलेट मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो 3 आणि प्रो 4 पेक्षाही पातळ आहे. ह्यात बिल्ट-इन प्रोजेक्टर दिला गेला आहे.
ह्या टॅबलेटच्या इतर वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात १२ इंचाची डिस्प्ले देण्यात आली आहे. ज्याचे रिझोल्युशन 2160×1440 पिक्सेल आहे. हा टॅबलेट 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. ह्यात स्टोरेजसाठी 1TB सॉलिड स्टेट ड्राइव दिली आहे. त्याचबरोबर ह्यात रियर सीन 3D कॅमेरा दिला गेला आहे.
तर लेनोवो थिंकपॅड X1 योगा टॅबलेटविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 14 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे. ह्यात कोर i7 प्रोसेसरसह 16GB ची रॅम दिली आहे. स्टोरेजसाठी 1TB SSD आहे. हा टॅबलेट 16.7mm इतका बारीक आहे. ह्याचे वजन 1.29 किलो आहे.