लेनोवो कंपनी आपल्या ऑनलाइन ब्रँड “जूक ” च्या अंतर्गत लवकरच भारतात आपला पहिला स्मार्टफोन लाँच करेल. हा स्मार्टफोन सायनोजेन OS वर चालेल, जो मे च्या दुस-या आठवड्यात लाँच होऊ शकतो.
मायक्रोमॅक्ससह सायनोजेनने २०१४ मध्ये भागीदारीची घोषणा केली होती. ज्यानंतर वनप्लसला भारतात आपल्या स्मार्टफोनमधून सायनोजेन OS ब्रँड हटवावे लागले होते. सायनोजेनने मागील वर्षी वनप्लससह आपली भागीदारी संपवण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून चीनी कंपनी आपल्या स्मार्टफोनमध्ये स्वत:चे ऑक्सीजन OS देत आहे.
तर दुसरीकडे मायक्रोमॅक्सची YU टेलिवेंचर्स सुरुवातीपासूनच आपली YU हँडसेटमध्ये सायनोजेन OS देत आहे. मात्र आता लेनोवो देशात सायनोजेन OS ने सुसज्ज असलेला स्मार्टफोन लवकरच लाँच करेल.
लेनोवोने असे स्पष्टीकरण दिले आहे की, कंपनीने आपल्या ऑनलाइन ब्रँड ‘जूक’ च्या अंतर्गत लवकरच भारतात आपला पहिला स्मार्टफोन लाँच करेल. हा स्मार्टफोन सायनोजेन OS वर चालेल, जो मे च्या दुस-या आठवड्यात लाँच होऊ शकतो.