LeEco ने आपले तीन स्मार्टफोन्स लाँचिंगबरोबरच टेलिव्हिजन सेट्स आणि एक ड्रायवरलेस कॉन्सेप्ट सुपर कारचे सुद्धा प्रदर्शन केले. कंपनीने बाजारात Le 2, Le 2 प्रो आणि Le मॅक्स 2 स्मार्टफोन्स लाँच केले. हे तिन्ही फोन्स USB टाइप-C ऑडियो पोर्ट (CDLA टेक्नॉलॉजी) ने सुसज्ज आहे, जो हाय क्वालिटी ऑडियो देतो. तिन्ही फोन्स मेटल बॉडी डिझाईन, पुढील बाजूस पातळ बेजल्स आणि फिंगरप्रिंट स्कॅनरसुद्धा आहे.
जर LeEco कारविषयी बोलायचे झाले तर, कंपनीचा दावा आहे की, ही जगातील पहिली ड्रायवरलेस कॉन्सेप्ट सुपरकार आहे. ह्या कारच्या डिझाईनविषयी बोलायचे झाले तर, ह्यात एक मोठी LED स्क्रीन दिली आहे. ह्या कारमध्ये फेसिअल रेकॉग्निशन, इमोशन रेकॉग्निशन, सिस्टम रेकॉग्निशन आणि पाथ रेकॉग्निशन तंत्रज्ञान आहे.
हेदेखील पाहा – तुम्हाला आणि तुमच्या शरीराला तणावमुक्त करतील हे ५ महत्त्वपुर्ण अॅप्स
ह्या कार्यक्रमात कंपनीने आपल्या 4th जेनचे तीन सुपर टिव्हीसुद्धा लाँच केले. सुपर 4 X50 प्रो, सुपर 4X50, सुपर 4X50 CSL. ह्या टिव्हीचा आकार ५० इंच आहे आणि हा 9.9mm अल्ट्रा-स्लिम मेटल बॉडीसह येतो.
हेदेखील वाचा – LeEco Le 2, Le 2 प्रो, Le मॅक्स 2 स्मार्टफोन लॉन्च
हेदेखील वाचा – २०१६ मधील आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट अॅनड्रॉईड गेम्स (एप्रिल 2016)