Oppo कंपनीने आपला नवीन टॅबलेट Oppo Pad Air नुकताच बाजारात लाँच केला आहे. मात्र, या टॅबचे लॉन्चिंग सध्या चीनमध्ये झाले आहे. Oppo Pad Air सोबत कंपनीने Oppo Enco R earbuds देखील लाँच केले आहेत. त्याबरोबरच, Oppo Pad Air सोबत कंपनीने Oppo Enco R earbuds देखील लॉन्च केले आहेत. चला तर जाणून घेऊयात या गॅजेट्सची किंमत आणि जबरदस्त स्पेसिफिकेशन्स…
Oppo Pad Air ची किंमत
Oppo Pad Air च्या 4 GB RAM सह 64 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 1,299 युआन म्हणजे सुमारे 15,100 रुपये एवढी आहे. त्याबरोबरच, 4 GB RAM सह 128 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 1,499 युआन म्हणजे सुमारे 17,500 रुपये इतकी आहे. तसेच, 6 GB रॅम असलेल्या आणि 128 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 1,699 युआन म्हणजे सुमारे 19,800 रुपये इतकी आहे.
Oppo Enco R earbuds ची किंमत
Oppo Pad Air सोबत कंपनीने Oppo Enco R earbuds देखील लाँच केले आहेत. Oppo Enco R ची किंमत 299 युआन म्हणजेच जवळपास 3,500 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या बड्समध्ये 13.4mm ड्रायव्हर देण्यात आला आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. त्याबरोबरच, इयरबड्सच्या बॅटरीबाबत 20 तासांचा बॅकअप असल्याचा दावादेखील कंपनीकडून करण्यात आला आहे.
Oppo Pad Air चे स्पेसिफिकेशन्स
Oppo Pad Air मध्ये Android 12 सह ColorOS आहे. यात 60Hz च्या रिफ्रेश रेटसह 10.36-इंच लांबीचा डिस्प्ले आहे, डिस्प्लेची ब्राइटनेस 360 आहे. पॅड एअरमध्ये ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU सह स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर आहे. तसेच, 6GB LPDDR4x रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज आहे.
शिवाय, Oppo Pad Air मध्ये 8 मेगापिक्सेल रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. टॅबमध्ये Wi-Fi 5, Bluetooth v5.1 आणि USB Type-C पोर्ट आहे. Oppo Pad Airमध्ये 7100mAh बॅटरी आहे, ज्याबरोबर 18W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे. त्याबरोबरच, टॅबमध्ये Dolby Atmos सपोर्ट असलेले चार स्पीकर देखील आहेत.