नवीनतम Xiaomi Pad 7 टॅबलेट Best AI फीचर्ससह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स  

नवीनतम Xiaomi Pad 7 टॅबलेट Best AI फीचर्ससह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स  
HIGHLIGHTS

Xiaomi ने नुकतेच आपले नवे टॅबलेट Xiaomi Pad 7 लाँच केले आहे.

कंपनीने हा टॅबलेट 30,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर केला आहे.

Xiaomi Pad 7 सह फोकस कीबोर्ड, फोकस पेन इ. प्रोडक्ट्स लाँच

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Xiaomi ने नुकतेच Xiaomi Pad 7 लाँच करण्यात आले आहे. हा कंपनीचा नवीनतम टॅबलेट आहे. कंपनीने हा टॅबलेट 30,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, यात नॅनो टेक्सचर डिस्प्ले, अँटी-ग्लेअर आणि अँटी-रिफ्लेक्टीव्ह स्क्रीन फीचर्स आहेत. याद्वारे डोळ्यांना चांगले संरक्षण मिळेल, त्यामुळे तीव्र प्रकाशातही ते स्पष्ट होते, असे कंपनीने सांगितले आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Xiaomi Pad 7 ची किंमत आणि सर्व तपशील-

Also Read: Redmi 14C 5G ची आज भारतात पहिली Sale सुरु, कमी किमतीत Powerful फीचर्ससह नवा स्मार्टफोन

XIAOMI PAD 7

Xiaomi Pad 7 ची किंमत

Xiaomi Pad 7 ची 8GB+ 128GB मॉडेलसाठी किंमत 27,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. फोनच्या 12GB+ 256GB मॉडेलची किंमत 30,999 रुपये इतकी आहे. तर, 12GB+ 256GB नॅनो टेक्सचर डिस्प्ले एडिशनची किंमत 32,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा टॅब ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे 1000 रुपयांच्या सवलतीसह खरेदी करता येईल. हा फोन ग्रेफाइट ग्रे, मिराज पर्पल आणि सेज ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

एवढेच नाही तर, यासह इतर प्रोडक्ट्स देखील लाँच करण्यात आले आहेत. तर, Xiaomi Pad 7 फोकस कीबोर्डची किंमत 8,999 रुपये इतकी आहे. तर, कव्हरची किंमत 1499 रुपये आणि Xiaomi फोकस पेनची किंमत 5,999 रुपये इतकी आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा टॅबलेट 13 जानेवारीपासून Amazon.in, mi.com आणि Xiaomi रिटेल स्टोअरमधून उपलब्ध होईल. तर दुसरीकडे, कव्हर आणि पेन देखील सोबत असतील, परंतु नॅनो टेक्सचर एडिशन आणि कीबोर्ड फेब्रुवारी 2025 मध्ये उपलब्ध होतील.

Xiaomi Pad 7 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

लेटस्ट Xiaomi Pad 7 मध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि HDR10 सपोर्टसह 11.2-इंच लांबीचा LCD 3K डिस्प्ले मिळणार आहे. स्पीड, मल्टिटास्किंग आणि उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा टॅबलेट Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरसह सज्ज करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या टॅबलेटमध्ये AI फीचर्स देखील उपलब्ध आहेत. ज्यामध्ये रायटिंग टूल्स, लाइव्ह सबटायटल्स, Xiaomi क्रिएशन इ. विविध AI फीचर्स मिळतील. हा टॅब 12GB पर्यंत RAM सह येतो. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या टॅबमध्ये मोठी 8,850mAh बॅटरी आहे, जी 45W जलद चार्जिंग सपोर्ट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo