Apple Intelligence सह लाँच झाला नवीन iPad Mini! मिळतील Powerful फीचर्स, जाणून घ्या किंमत

Apple Intelligence सह लाँच झाला नवीन iPad Mini! मिळतील Powerful फीचर्स, जाणून घ्या किंमत
HIGHLIGHTS

Apple ने Apple Intelligence च्या सपोर्टने नवीन iPad Mini लाँच केला.

Apple Intelligence हे कंपनीचे स्पेशल आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणेजच AI मॉडेल आहे.

नवीन iPad Mini सह Apple Pencil Pro चे समर्थन आहे.

प्रसिद्ध आणि जगभरात लोकप्रिय टेक जायंट Apple ने Apple Intelligence च्या सपोर्टने नवीन iPad Mini लाँच केला आहे. iPad Mini 7व्या जनरेशनचे मॉडेल आहे, जे A17 Pro चिपसेटच्या सपोर्टसह सादर केले गेले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Apple Pencil Pro सह नवीन iPad Mini वर काम करता येईल. Apple ने तीन वर्षांनंतर iPad Mini अपडेट केला आहे.

लक्षात घ्या की, Apple Intelligence हे कंपनीचे स्पेशल आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणेजच AI मॉडेल आहे, यासह तुम्हाला AI चा उत्तम अनुभव मिळेल. त्याबरोबरच, यात काही असे फीचर्स देखील आहेत, जी Apple ने प्रथमच iPad Mini मध्ये समाविष्ट केले आहेत.

apple ipad mini 7

Also Read: आगामी OnePlus 13 असेल कंपनीचा महागडा स्मार्टफोन! लाँचपूर्वीच किंमत Leak, काय मिळेल विशेष?

नव्या Apple iPad Mini 7 ची किंमत

Apple iPad Mini 7 तीन स्टोरेजमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये 128GB, 256GB आणि 512GB या स्टोरेज व्हेरिएंटचा समावेश आहे. या आयपॅडच्या 128GB व्हेरिएंटची किंमत 49,900 रुपये, 256GB व्हेरिएंटची किंमत 59,900 रुपये आणि 512GB व्हेरिएंटची किंमत 79,900 रुपये इतकी निश्चित केली गेली आहे. हे उपकरण ब्लू, व्हायलेट, स्टारलाइट आणि स्पेस ग्रे या कलर ऑप्शन्समध्ये मिळेल.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Apple iPad Mini 7 ची विक्री कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, Apple BKC आणि Apple Saket Store सह अधिकृत रिटेल स्टोअर्सवर 23 ऑक्टोबरपासून सुरू होईल.

iPad Mini 7 अपडेट्स

iPad Mini च्या अपडेट्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात सर्वात मोठे फीचर म्हणजे Apple Intelligence होय. याशिवाय, नवीन iPad Mini सह Apple Pencil Pro चे समर्थन आहे. नव्या डिवाइसचे आणखी एक मोठे अपडेट म्हणजे Apple आता iPad Mini मध्ये बेस स्टोरेज म्हणून 128GB ऑफर करतो.

Apple iPad mini

Apple iPad Mini 7 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

iPad Mini 7 मध्ये 8.3 इंच लांबीचा डिस्प्ले आहे. नवीन आयपॅड मिनी ट्रू टोन आणि P3 वाइड कलरसाठी Apple च्या लिक्विड रेटिना टेक्नॉलॉजीसह येतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, Apple A17 Pro चिपसेटच्या सपोर्टसह iPad Mini 7 लाँच करण्यात आला आहे. तर Apple Intelligence मध्ये नवीन रायटिंग टूल्स आणि नवीन Siri सपोर्ट यांसारखे बेनिफिट्स उपलब्ध आहेत.

Apple ने असेही म्हटले आहे की, नवीन iPad Mini Wi-Fi 6E ला समर्थन देते, जे मागील पिढीपेक्षा दुप्पट परफॉर्मन्स देईल. नवीन iPad Mini मध्ये 12MP रियर कॅमेरा समाविष्ट आहे, जो आता चांगल्या डायनॅमिक रेंजसह येतो. त्याबरोबरच, समोर 12MP कॅमेरा देखील आहे. रियर कॅमेरामधेय स्मार्ट डॉक्युमेंट स्कॅनिंगसाठी SmartHDR 4 साठी सपोर्ट देखील आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo