आमिर खान स्टारर 'लाल सिंग चड्ढा' हा अलीकडच्या काळातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट आहे. तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला असेल, परंतु या काळात तो सर्वाधिक चर्चेत राहिला. सोशल मीडियावरील एका वर्गाने 'लाल सिंग चड्ढा' विरोधात बहिष्काराचा ट्रेंड सुरू केला. अलीकडच्या काळात बॉयकॉट चित्रपटांचा ट्रेंड खूप वाढला आहे. अनेक चित्रपटांना याचा सामना करावा लागत आहे.
मात्र, याचा त्याच्या व्यवसायावर कितपत परिणाम होतो, काही स्पष्टपणे सांगता येत नाही. कारण बहिष्कारानंतरही आमिरच्या 'दंगल'ने कलेक्शनचे नवे रेकॉर्ड बनवले होते. मात्र, 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटगृहात चालला नाही, त्याला OTT वर कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहावे लागेल. हा चित्रपट पुढील महिन्यात OTT वर प्रदर्शित होणार आहे.
हे सुद्धा वाचा : अप्रतिम ऑफर ! अगदी फुकटात मिळतोय iPhone 12, एक रुपयासुद्धा देण्याची गरज नाही
'लाल सिंह चड्ढा' 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज झाला. या चित्रपटात करीना कपूर, मोना सिंग, नागा चैतन्य यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाचे बजेट 180 कोटी आहे. पूर्वी असे वृत्त होते की, चित्रपट त्याच्या थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर 6 महिन्यांनंतर OTT वर स्ट्रीम होईल. परंतु इंडिया टुडे मधील एका अहवालात असे म्हटले आहे की 'लाल सिंग चड्ढा' ऑक्टोबरमध्ये NETFLIX वर रिलीज होणार आहे.
NETFLIX कडे 'लाल सिंग चड्ढा'चे OTT अधिकार आहेत. ते 20 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसारित केले जाईल. याआधी अशी बातमी आली होती की, आमिर OTT राइट्ससाठी 150 कोटी मागत आहे. Netflix ने जवळपास 80-90 कोटींमध्ये ही डील फायनल केली आहे.