'कॉफी विथ करण'चा 7 वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
करणने इंस्टाग्रामवर व्हीडिओ शेअर करत दिली माहिती
नव्या सिझनसाठी प्रेक्षकांची प्रतीक्षा अखेर संपली
चित्रपट निर्माता करण जोहरने पुन्हा एकदा 'कॉफी विथ करण'चा 7 वा सीझन प्रेक्षकांसाठी आणण्यास सहमती दर्शवली आहे. करण जोहर अनेक वर्षांपासून हा शो होस्ट करत आहे. आता प्रेक्षक त्याच्या 7व्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते आणि ही प्रतीक्षा आता संपली आहे. करण जोहरने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो पहिल्यांदा ट्रोलिंग मेसेजकडे दुर्लक्ष करत आहे. त्यानंतर शेवटी त्याने शोची रिलीज डेटही सांगितली आहे.
करण जोहरने कॉफी विथ करण 7 या शोचा प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये करण म्हणतो, 'मला माहित आहे की प्रत्येकजण कॉफी विथ करणची आतुरतेने वाट पाहत आहे. त्यानंतर व्हिडिओमध्ये ट्रोलर्सचे मेसेज दिसू लागतात. ज्यामध्ये काही लोक त्याला नेपो किंग तर काही त्याला बॉयकॉट करण्याबद्दल बोलत आहेत. करण स्पष्टपणे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणतो की, मला माहित आहे सर्व नाही परंतु काही लोक शो ची नक्की वाट पाहत आहेत.
याच व्हिडिओमध्ये करण जोहर फोनवर अनेक सेलिब्रिटींना शोमध्ये येण्यासाठी विनवणी करत असल्याचंही दिसत आहे. करण म्हणतो, 'मी कोणताही वैयक्तिक प्रश्न विचारणार नाही. मी दोन गिफ्ट हॅम्पर देईन. या शोसाठी तुम्ही आपली जुनी मैत्री संपवाल का? मी तुला लाँच करेन, अशा बऱ्याच गोष्टींनंतर करण शेवटी म्हणतो, 'सगळ्यांना सोडा, मी धमाका करणार आहे. लोक माझा तिरस्कार वा प्रेम करू शकतात, परंतु तुम्हाला कॉफी विथ करणचा कधीही कंटाळा येणार नाही. 7 जुलै रोजी कॉफी विथ करणचा 7 वा सीझन रिलीज होतोय."
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.