रणबीर कपूर स्टारर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'ब्रह्मास्त्र'ला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. अयान मुखर्जीचा हा चित्रपट अनेक प्रेक्षकांना आवडला, तर आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा अभिनय अनेकांना आवडला नाही. मात्र, आता 'ब्रह्मास्त्र 2'मध्ये कोणते स्टार्स दिसणार आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
हे सुद्धा वाचा : Bigg Boss लव्हर्स ! 24 तास Bigg Boss Live बघायचे आहे ? तर करा फक्त 'हे' काम
ज्या प्रेक्षकांनी 'ब्रह्मास्त्र पार्ट वन : शिवा' पाहिला आहे. त्यांना या चित्रपटातील शिवाचे पात्र किती महत्त्वाचे आहे हे चांगलेच ठाऊक आहे. 'ब्रह्मास्त्र 2'मध्ये रणबीर कपूरच्या शिवाची भूमिका देवसोबत होणार आहे. त्यामुळेच आता या व्यक्तिरेखेबद्दल प्रेक्षकांना खूप उत्सुकता लागली आहे.
तर अशी बातमी पुढे येत आहे की, ब्रह्मास्त्र 2 मधील देवच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी KGF स्टार 'यश'शी संपर्क साधला आहे. देवच्या पात्रासाठी निर्माते बॉलिवूडपासून टॉलिवूडपर्यंत फेऱ्या मारत आहेत. त्यामुळे आता तुम्हाला समजले असेलच की, देवचे पात्र ब्रह्मास्त्रमध्ये किती महत्त्वाचे असणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, असेही वृत्त आहे की, यशने अद्याप या भूमिकेसाठी निर्मात्यांना होकार दिलेला नाही. ब्रह्मास्त्रमधील देवच्या भूमिकेसाठी आतापर्यंत रणवीर सिंग आणि हृतिक रोशनची नावे समोर आली आहेत. रणवीरच्या वडिलांची भूमिका रणवीर आणि आई अमृताची भूमिका दीपिका पदुकोण पडद्यावर साकारणार असल्याचे काही चाहत्यांचे म्हणणे आहे. मात्र, निर्मात्यांनी अद्याप अशी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
असे सांगितले जात आहे की, केवळ 'ब्रह्मास्त्र'च नाही तर एक्सेल एंटरटेनमेंटलाही यशला 'कर्ण'साठी बोर्डात आणायचे आहे. हे महाभारतावर आधारित पौराणिक महाकाव्य असेल. रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन यांच्याशिवाय 'ब्रह्मास्त्र'मध्ये शाहरुख खान आणि नागार्जुनसारखे मोठे दाक्षिणात्य स्टार्सही दिसले. ज्यामुळे निर्मात्यांनाही खूप फायदा झाला.