सुरक्षित ऑनलाइन ट्रांजेक्शन साठी तुम्ही वापरू शकता हे सोप्पे उपाय

Updated on 05-Apr-2018
HIGHLIGHTS

या उपायांचा वापर करून तुम्ही सुरक्षितपणे ऑनलाइन ट्रांजेक्शन करू शकता

आजकाल इन्टरनेट ची लोकप्रियता वाढण्यासोबतच आपण प्रत्येक कामासाठी इन्टरनेट वर अवलंबून रहायला लागलो आहे. जर ऑनलाइन ट्रांजेक्शन बद्दल बोलायचे झाले तर त्यासाठी आपण काळजी घ्यावी ज्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या रेंसमवेयर किंवा साइबर क्राइम पासून वाचू शकाल. 
या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगत आहोत ज्या लक्षात ठेऊन तुम्ही एक सुरक्षित ऑनलाइन ट्रांजेक्शन करू शकता. 
कधीही कोणत्याही फाइनेंशियल ट्रांजेक्शन दरम्यान कोणत्याही साइबर कॅफे, शेयर्ड कंप्यूटर किंवा पब्लिक Wi-Fi सिस्टम चा वापर करू नका. 
नेहमी आपला कम्प्यूटर एंटी-वायरस सॉफ्टवेयर सह वापरा आणि आपला कम्प्यूटर नेहमी ऑपरेटिंग सिस्टम आणि सिक्योरिटी पॅच सह अपडेटेड ठेवा. 
बँक, म्यूच्यूअल फण्ड इत्यादी फाइनेंशियल ट्रांजेक्शन दरम्यान पासवर्ड ची निवड अत्यंत काळजीपूर्वक करा. आपल्या नात्यातील लोकांची, जन्मतारीख, एनिवर्सरी इत्यादीचा समावेश पासवर्ड मध्ये करू नका कारण अशा पासवर्डचा अंदाज अगदी सहज लावला जाऊ शकतो. 
नेहमी अशा ईमेल्स वर लक्ष ठेवा जे तुमची खासगी फाइनेंशियल माहिती मागतात. हे लक्षात असू दे सरकार, SEBI, RBI इत्यादी कधी पासवर्ड किंवा कार्ड नंबर इत्यादीची माहिती मागत नाहीत. 
ईमेल वर आलेल्या कोणत्याही अशा लिंक वर क्लिक करताना सावध रहा. 
कधीही कोणत्याही अनोळखी व्यक्ति जवळ किंवा सोशल मीडिया वर कोणाजवळ आपला पासवर्ड शेयर करू नका. 
नेहमी बँक च्या वेबसाइट च्या लॉगिन पेज वर SSL (सिक्योर सॉकेट लेयर)/ https सुरक्षा नेहमी बघा. 
तसेच अशाच प्रकारची काळजी ऑनलाइन शॉपिंग साइट वर पण घ्या आणि हे लक्षात असू द्या कि तुमच्या कार्ड नंबर आणि खासगी माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी SSL सुरक्षित आहे. ब्राउजर विंडो मध्ये पॅडलॉक आइकॉन आहे की नाही ते बघा. 
आपल्या कार्ड च्या अनधिकृत वापरा नंतर त्वरित आपल्या कार्ड प्रोवाइडर किंवा बँक ला कळवा. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :