Big Boss OTT : करण कुंद्राने केले करण जोहरला रिप्लेस? प्रेयसी तेजस्वी प्रकाशबरोबर शोमध्ये एंट्री !

Updated on 03-Jun-2022
HIGHLIGHTS

Big Boss OTTच्या नव्या सीझनमध्ये करण कुंद्रा असेल होस्ट

शोमध्ये प्रेयसी तेजस्वी प्रकाशसोबत होणार करण कुंद्राची एंट्री

'कॉफी विथ करण' शोचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने अनेक वर्षांपूर्वी टीव्हीवर पदार्पण केले आहे. त्याच्या 'कॉफी विथ करण' शोला प्रेक्षकांकडून खास पसंती मिळाली. पण गेल्या वर्षी करण जोहर बिग बॉस OTTचा पहिला सिझन होस्ट करताना दिसला. दरम्यान, या शोमध्ये अभिनेता करण कुंद्रा करण जोहरला रिप्लेस करणार आहे, अशी बातमी पुढे आली आहे. बिग बॉस OTTचा दुसरा सीझन करण कुंद्रा गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री तेजस्वी प्रकाशसोबत होस्ट करणार आहे. 

अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही

मीडिया रिपोर्ट्समध्ये या बातम्या सांगण्यात येत असल्या तरीही, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, कंगना रणौतच्या लॉक अप शोमध्ये करण कुंद्राच्या आगमनाचा खूप फायदा झाला होता, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. लॉकअपच्या काही खास एपिसोड्सनंतर, आता करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश या प्रोजेक्टसाठी एकत्र काम करणार असल्याची चर्चा सुरु आहे. 

हे सुद्धा वाचा : Instagramकडून एक आकर्षक अपडेट जारी, आता रिल्स बनवणे होणार अधिक मजेशीर

बिग बॉसमध्ये सुरु झाली लव्हस्टोरी

बिग बॉस 15 सीझनची खूप चर्चा झाली आणि यावेळी करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश या शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसले. सुरुवातीच्या काही आठवड्यांनंतर दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले. त्यानंतर बघता बघता त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली. बिग बॉसचे घर सोडल्यानंतरही त्यांचे प्रेम कायम आहे. सध्या ते दोघेही TVच्या पॉवर कपलच्या यादीमध्ये टॉपवर आहेत.  

'कॉफी विथ करण' शोचा नवा सिझन

 करण जोहरबद्दल बोलायचे झाले तर,  तो लवकरच 'कॉफी विथ करण 7' मध्ये दिसणार आहे. सध्या शोचे शूटिंग सुरू असून लवकरच त्याचे प्रसारणही होणार आहे. यावेळी करणच्या शोच्या काउचवर कोणकोणते सेलेब्स बसतील हे बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :