Aadhaar Card: त्वरा करा! Free मध्ये तुमचे कार्ड अपडेट करण्यासाठी फक्त काही दिवस बाकी, पहा प्रक्रिया

Updated on 05-Sep-2024
HIGHLIGHTS

Aadhaar Card मोफत ऑनलाईन अपडेट करण्याची तारीख 14 सप्टेंबर 2024

तुमच्याकडे 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचे आधार कार्ड असेल तर तुम्हाला आधार अपडेट करावे लागणार आहे.

या कालावधीत तुमचे आधार अपडेट करून घ्या, अन्यथा तुम्हाला शुल्क द्यावे लागेल.

Aadhaar Card मध्ये कागदपत्र मोफत अपलोड करण्याची तारीख आता अगदी जवळ आली आहे. त्यामुळे ज्यांनी आतापर्यन्त आपले आधार कार्ड अपडेट केलेले नाही, त्यांना आता घाई करावी लागणार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, जर तुमच्याकडे 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचे आधार कार्ड असेल तर तुम्हाला आधार अपडेट करावे लागणार आहे. तुम्हाला ऑनलाईन आधार कार्ड मोफत अपडेट करता येईल.

Also Read: BSNL ची सिम खरेदी करताय? ‘अशा’ प्रकारे तपासा, तुमच्या क्षेत्रात चांगले नेटवर्क उपलब्ध आहे की नाही?

लक्षात घ्या की, मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सरकारने 14 सप्टेंबर 2024 ही तारीख निश्चित केली आहे. तुमच्याकडे आधार मोफत अपडेट करण्यासाठी फक्त काही दिवसांचा अवधी आहे. तुम्ही घरी बसून तुमचे आधार मोबाईलद्वारे अपडेट करू शकता.

UIDAI कडून नागरिकांना आवाहन

UIDAI लोकांना आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सतत आवाहन करत आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुकवरील एका पोस्टमध्ये UIDAI ने लोकांना आवाहन केले आहे की, आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर आहे. त्याआधी तुमचे आधार अपडेट करून घ्या, अन्यथा तुम्हाला शुल्क द्यावे लागेल.

घरबसल्या Aadhaar Card अपडेट करण्याची सोपी प्रक्रिया

  • सर्वप्रथम मोबाइल किंवा लॅपटॉपवरून UIDAI वेबसाइटवर जा.
  • यानंतर अपडेट आधारच्या पर्यायावर क्लिक करा.
  • आता आधार क्रमांक टाकून OTP द्वारे लॉग इन करा.
  • यानंतर डॉक्युमेंट अपडेट वर क्लिक करा आणि व्हेरिफाय करा.
  • आता खालील ड्रॉप लिस्टमधून ओळखपत्राची स्कॅन केलेली प्रत आणि पत्ता पुरावा अपलोड करा.
  • आता सबमिट वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला एक विनंती क्रमांक मिळेल आणि फॉर्म सबमिट केला जाईल.

अशाप्रकारे, तुम्हाला विनंती क्रमांकावरून अपडेट स्टेटस देखील तपासता येईल. यानंतर काही दिवसांनी तुमचा आधार अपडेट होईल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :