नासा: जूनो यानाने अखेर यशस्वीरित्या केला गुरुकक्षेत प्रवेश

Updated on 05-Jul-2016
HIGHLIGHTS

अमेरिकन अंतराळ संस्था म्हणजेच नासाने अखेर यशस्वीरित्या आपण पाठवलेल्या यानाचा गुरु कक्षेत प्रवेश केला. ह्या पुर्ण प्रक्रियेसाठी तब्बल ५ वर्षांचा कालावधी लागला.

संपूर्णत: सोलार इंजिनवर बनविण्यात आलेले हे जूनो सॅटेलाइट जवळपास पाच वर्षांपूर्वी म्हणजेच ५ ऑगस्ट २०११ ला गुरु कक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी ग्रहावर पाठविण्यात आले होते.

 

ग्रहाच्या अंतर्गत रचनेविषयी माहिती करुन घेण्यासाठी अंतरिक्ष यानाचा वापर करण्याची संशोधकांची योजना आहे. त्यांना असे वाटते की, ह्याच्या माध्यमातून त्यांना अब्जावधी वर्षांपुर्वी ह्याची काय रचना असावी, ह्यासंबंधीचे काही धागेदोरे सापडतील.

 

ह्याआधीही पाठवलेल्या अंतरिक्ष यानाची गुरुकक्षेत जाण्याची हिंमतच झाली नाही, कारण त्यातील तीव्र विकिरणांनी असुरक्षित असलेल्या इलेक्ट्रॉनिक्सला नष्ट केले होते.

हेदेखील वाचा – भारतात लाँच झाला पॅनासोनिक एलुगा नोट स्मार्टफोन, किंमत १३,२९० रुपये
हेदेखील वाचा – 
ग्लॉसी मेटल बॉडीने सुसज्ज असलेला TCL 560 स्मार्टफोन भारतात लाँच

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :