सध्या भारतीय बाजारात JioTV+ हे अतिशय लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. वापरकर्त्यांच्या सोयी-सुविधेसाठी कंपनी नवीन फीचर्स लाँच करत असते. दरम्यान, सर्वत्र AI चा वापर वाढत असताना JioTV+ ने देखील आता AI वापरण्यास सुरुवात केली आहे. AI च्या कमालीने हा प्लॅटफॉर्म वापरण्याचा अनुभव आणखी जबरदस्त होईल. तसेच, तुमच्या कुटुंबासोबत शोज पाहत असताना कुणाला लाजिरवाणे वाटणार नाही, याची देखील नवे फिचर काळजी घेईल.
Also Read: VI New Plan: कंपनीने परत लाँच केला 719 रुपयांचा प्लॅन, दीर्घकाळ वैधतेसह Unlimited बेनिफिट्स उपलब्ध
JioTV+ ने अलीकडेच एक नवीन फिचर सादर केले आहे. कंपनीने या फीचरला AI Sensor असे नाव दिले आहे. नावावरून स्पष्ट आहे, या फीचरसह फोटो-व्हिडिओ AI च्या मदतीने सेन्सॉर केले जातील. JioTV+ चे AI सेन्सर सर ऍडल्ट्स सीन्सना आपोआप सेन्सर करते. इतकेच नाही तर, प्रसंगानुसार ऑडिओ देखील म्यूट केले जाते. एकंदरीत JioTV+ तुमच्या कुटुंबासोबत तुमचा आवडता चित्रपट किंवा वेब सिरीज पाहताना तुम्ही विचित्र परिस्थितीत अडकणार नाही, याची खात्री करेल. वर सांगितल्याप्रमाणे, हे फिचर वापरकर्त्यांना लाजिरवाणे होण्यापासून वाचवेल.
JioTV+ ऍप हे खास स्मार्ट टीव्हीसाठी डिझाइन करण्यात आले आहे. हे Jio सेट-टॉप बॉक्ससह देखील येते. Jio TV+ मध्ये लाइव्ह टीव्ही चॅनेल आणि OTT सबस्क्रिप्शनही युजर्सना दिले जाते. यामध्ये युजर्सना 800 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल पाहायला मिळतात. याशिवाय, अनेक OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शनही यूजर्सना दिले जाते. यामध्ये वापरकर्ते Hotstar, Amazon Prime Video, Zee5 सारखे OTT प्लॅटफॉर्म वापरू शकतात. एवढेच नाही तर, JioTV+ ॲपचे Jio Fiber आणि Jio AirFiber सदस्यांसाठी मोफत सब्सक्रिप्शन आहे.
हे ॲप अलीकडेच PlayStore, Galaxy Store आणि LG Content Store वर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्यामुळे एकाधिक टेलिव्हिजन असलेल्या वापरकर्त्यांना JioTV+ अखंडपणे ऍक्सेस करता येईल. लक्षात घ्या की, JioTV+ हे JioTV पेक्षा वेगळे आहे, JioTV स्टँडअलोन OTT ॲप आहे. जे स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्हीवर इन्स्टॉल केले जाऊ शकते. तसेच, JioTV+ फक्त टेलिव्हिजनवर वापरता येते.