JioTag Go: भारतातील आघाडीची दूरसंचार सेवा प्रदाता Reliance Jio ने नवा JioTag Go लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा भारतातील पहिला Android टॅग असल्याचा कंपनीचा दावा आहे. JioTag Go हा एक आकर्षक, कॉम्पॅक्ट ऍसेट ट्रॅकर आहे, जो तुम्हाला कीज, आयडी कार्ड, पाकीट, पर्स, सामान, पाळीव प्राणी आणि इतर वस्तू जसे की गहाळ किंवा हरवण्याची शक्यता असते, अशा मौल्यवान वस्तू शोधण्यात आणि ट्रॅक करण्यात मदत करतो.
याबद्दल सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, JioTag Go हा एक ब्लूटूथ-सक्षम लॉस्ट अँड फाउंड ट्रॅकर आहे. यासह तुमच्या वैयक्तिक वस्तूंना टॅग करणे आणि शोधणे सहज शक्य होते. Jio Recharge Plans
JioTag Go हे डिवाइस 1,499 च्या स्पेशल लाँच प्राईसवर सध्या उपलब्ध आहे. मात्र, याची मूळ किंमत 2,999 रुपये इतकी आहे. सध्या हा डिवाइस 50% सवलतीसह उपलब्ध आहे. टॅग एक वर्षाची वॉरंटी, बदलण्यायोग्य CR2032 बॅटरी एक वर्षापर्यंतचे बॅटरी लाईफ, अतिरिक्त बॅटरी इ. सह येतो. हे डिवाइस व्हाईट, ऑरेंज, येलो आणि ब्लॅक कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे.
एवढेच नाही तर, यात आयटम शोधण्यात मदत करण्यासाठी 120 dB चे इनबिल्ट स्पीकर, ब्लूटूथ v5.3 कनेक्टिव्हिटी आहे. यात कार्य करण्यासाठी सिम कार्डची आवश्यकता नाही. “हा स्मार्ट ट्रॅकर गोपनीयता आणि सुरक्षितता लक्षात घेऊन डिझाइन केला आहे. ज्यामध्ये अज्ञात ट्रॅकर ॲलर्ट्स आहेत, असे जिओने आपल्या वेबसाइटवर सांगितले आहे.” उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, JioTag Go रिलायन्स डिजिटल, Amazon, JioMart आणि डिजिटल लाइफ स्टोअरमधून खरेदी केले जाऊ शकते.
नवीन Google Find My Device वैशिष्ट्यासह JioTag Go हा भारतातील पहिला आयटम ट्रॅकिंग टॅग आहे. तुम्ही या टॅगच्या आसपास नसला तरीही तुम्ही त्याचा मागोवा घेऊ शकता. जगातील सर्व Android फोनचे नेटवर्क वापरून ही प्रणाली कार्य करेल, असे सांगण्यात आले आहे. लक्षात घ्या की, ही सिस्टम Apple च्या AirTag प्रमाणेच कार्य करते.
या फिचरचे समर्थन करणारे सर्व Android फोन सतत Android टॅग स्कॅन करतात आणि शोधतात. हा डेटा रिअल टाइममध्ये Google च्या सर्व्हरवर अपलोड केला जातो. तुम्ही टॅग शोधण्याचा प्रयत्न करता तेव्हा, Google हाच डेटा वापरून ट्रॅकरचे अचूक शेवटचे ज्ञात स्थान तुम्हाला देईल. डिवाइस Google आणि Android द्वारे समर्थित गोपनीयता फीचर्ससह देखील येतो. जवळपास अनोळखी ट्रॅकर आढळल्यास, तो जवळपासच्या सर्व Android स्मार्टफोनला अलर्ट करेल.