गेल्या अनेक दिवसांपासून Reliance- Disney+Hotstar च्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरु होत्या. आता अखेर Reliance- Disney+Hotstar चे विलिनीकरण झाले आहे. याबाबत कंपनीकडून अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीची नवीन वेबसाइट JioStar.com अनेक कंटेंटसह लाईव्ह करण्यात आली आहे. पूर्वी या वेबसाइटवर लवकरच येत असल्याचे लिहिले होते. आता त्यात अनेक तपशील देखील जोडले गेले आहेत.
एवढेच नाही तर, या वेबसाईटसाठी प्लॅन्स देखील लाईव्ह करण्यात आले आहेत. या प्लॅन्समध्ये, कंपनी स्टार आणि कलर्स सारख्या टीव्ही चॅनेल आणि JioCinema आणि Hotstar सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून कंटेंट प्रदान करणार आहे. यामध्ये मनोरंजन, डिजिटल आणि क्रीडा यांचा समावेश आहे.
Also Read: BSNL ने लाँच केली पहिली Satellite-to-Device सर्व्हिस! विना नेटवर्क करता येतील कॉल-मेसेज
वर सांगितल्याप्रमाणे, Jiostar साठी प्लॅन्सची यादी देखील वेबसाइटवर लाईव्ह करण्यात आली आहे. हे पॅक दोन श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. यातील एक स्टॅंडर्ड डेफिनेशन आणि दुसरी हाय डेफिनेशन होय. स्टँडर्ड डेफिनिशन प्लॅन्सची सुरुवातीची किंमत 59 रुपये प्रति महिना आहे, ज्यामध्ये 16 चॅनेल उपलब्ध असतील. तर, हाय डेफिनिशन प्लॅनची किंमत 88 रुपये प्रति महिना पासून सुरू होते, ज्यामध्ये 15 चॅनेल उपलब्ध आहेत. याशिवाय 125 रुपयांचा प्लॅन आहे, ज्यामध्ये 22 चॅनेल आहेत.