रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या Jio Platforms Limited ने DigiBoxx या भारतीय फाइल स्टोरेज आणि शेअरिंग प्लॅटफॉर्मसोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीअंतर्गत, Jio सेट-टॉप बॉक्स (STB) वापरकर्त्यांना जे टीव्हीवर JioPhotos ऍप वापरतात. त्यांना आधीच दिलेल्या 20GB व्यतिरिक्त 10GB अतिरिक्त स्टोरेज ऑफर करत आहे. परंतु वापरकर्त्यांनी JioPhotos ऍपद्वारे DigiBoxx साठी साइन अप केले तरच अतिरिक्त स्टोरेज मिळेल. JioPhotos ऍपवर नोंदणीकृत वापरकर्ते त्यांच्या स्मार्टफोनमधून सहजपणे फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकतात आणि एकाच ठिकाणी वेगवेगळ्या फॉरमॅट फाईल सेव करू शकतात.
हे सुद्धा वाचा : 5 कॅमेरे, 5000mAh बॅटरी, 512GB पर्यंत स्टोरेज असलेल्या Redmi फोनवर भारी सूट, जाणून घ्या ऑफर
JioPhotos ऍप Jio च्या STB वर प्री-लोड केलेले आहे. Jio STB मिळवण्यासाठी, तुम्हाला JioFiber कनेक्शन घेणे आवश्यक आहे. JioPhotos ऍपद्वारे, वापरकर्ते JioCloud आणि Google Photos सारख्या विविध क्लाउड स्टोरेजमध्ये सेव्ह केलेला त्यांचा सर्व कंटेंट बघू शकतात.
JioPhotos ऍप फेस रेकग्निशनसह काही व्हिडिओ आणि फोटो देखील ग्रुप करू शकतो. जिओने सांगितले की, जेव्हा एखादा वापरकर्ता त्याचे DigiBoxx खाते JioPhotos ऍपशी लिंक करतो, तेव्हा DigiBoxx खात्यातील सर्व व्हिडिओ आणि फोटो ऑर्गनाईज होतात. ही DigiBoxx साठी गेम-चेंजर पार्टनरशिप ठरेल. कंपनीला लाखो जिओ वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्याची सुविधा मिळेल आणि जिओ आपल्या वापरकर्त्यांना काही अतिरिक्त ऑफर देखील देईल.