Jio ने लाँच केला अनोखा डिवाइस! तुमची नॉर्मल कार सहज बनेल Smart Car, Limited Time ऑफर देखील उपलब्ध

Updated on 06-Nov-2023
HIGHLIGHTS

JioMotive डिवाइस Jio ने भारतीय कार वापरकर्त्यांसाठी लाँच केला.

रिलायन्स जिओच्या JioMotive डिवाइसची किंमत 4,999 रुपये आहे.

लिमिटेड टाइम ऑफर, JioMotive पहिल्या वर्षासाठी मोफत आहे.

भारतीय कार वापरकर्त्यांसाठी एका मोठ्या उपक्रमात, रिलायन्स Jio ने एक नवीन डिव्हाइस लाँच केले आहे. होय, ही बातमी खास भारतीय कार वापरकर्त्यांसाठी आहे. या डिव्हाइसचे नाव JioMotive आहे. हे उपकरण खास वाहन सुरक्षा आणि वाहन चालवण्याच्या सोयीसाठी सादर करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे कार आहे, विशेषतः ज्या मुलांकडे चारचाकी वाहन म्हणेजच कार आहे. ते त्यांच्या कारची मोठ्या प्रमाणात आणि नाजूकपणे काळजी घेतात.

हे डिवाइस तुमची कार हाताळण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मदत करेल. तुम्ही काही महत्त्वाची कामे अगदी सहज करू शकणार आहात. तसेच काही आश्चर्यकारक गोष्टीदेखील या डिवाइसद्वारे होणार आहेत. वाचा सविस्तर-

JioMotive ची किंमत आणि उपलब्धता

रिलायन्स जिओच्या JioMotive डिवाइसची किंमत 4999 रुपये आहे. तुम्ही ते अनेक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकता, जसे की तुम्हाला ते Amazon India वर मिळणार आहे. याशिवाय तुम्ही ते Reliance Digital E-Commerce साइटवरून देखील खरेदी करू शकता. एवढेच नाही तर jio.com इ. वरून हे डिवाइस खरेदी करता येईल.

JioMotive डिव्हाइसचा वापर कसा कराल?

JioMotive कारच्या OBD पोर्टशी कनेक्ट केले जाऊ शकते. हे एक फिचर आहे, जे तुम्हाला सर्व कारमध्ये सहज सापडेल. हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला रिलायन्स Jio चे हे उपकरण आवश्यक असेल. या उपकरणाद्वारे तुम्हाला तुमच्या कारचे 4G GPS ट्रॅकिंग रिअल टाइममध्ये मिळेल. हे उपकरण कार मालकाला त्याच्या कारचे सर्व अपडेट देणार आहे. हे उपकरण असल्‍याने कार ओनरची चिंता बर्‍याच प्रमाणात कमी होत आहे. याशिवाय, वापरकर्ते geo-fences देखील तयार करू शकतात, जेणेकरून त्यांना त्यांच्या कारचे त्वरित अपडेट मिळतील.

Jio सिमसोबत करेल काम

महत्त्वाचे लक्षात घ्या की, JioMotive डिव्हाइस विशेषतः Jio सिमसोबत काम करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. म्हणजेच ते इतर कोणत्याही सिमसह काम करणार नाही. जिओच्या ग्राहकांना ही विशेष संधी Jio कडून दिली जात आहे.

कारची देखील घेणार काळजी

या उपकरणाच्या मदतीने ग्राहकांना त्यांच्या वाहनांच्या आरोग्यावरही लक्ष ठेवले जाणार आहे. याशिवाय ग्राहकांना डायग्नोस्टिक ट्रबल कोड (DTC) अलर्ट मोठ्या प्रमाणावर मिळणार आहेत. यासाठी एक App इन्स्टॉल करावे लागेल. JioMotive च्या माध्यमातून ड्रायव्हरच्या वर्तनावरही लक्ष ठेवता येते. यात चालकाच्या सवयी आणि रस्त्यावरील त्याची कामगिरीही तपासली जाते, असे सांगितले जात आहे.

चोरी किंवा अपघात झाल्यास सूचित करेल.

विशेषतः ग्राहकांसाठी JioMotive डिव्हाइसमध्ये अँटी थेफ्ट आणि अपघात शोधण्याची क्षमता देखील समाविष्ट करण्यात आली आहे. म्हणजेच कोणत्याही ग्राहकाची कार चोरीला गेल्यास हे उपकरण त्याला त्वरित अपडेट देणार आहे. केवळ चोरीच नाही तर, अपघाताच्या बाबतीतही असेच केले जाणार आहे. याव्यतिरिक्त, यात उत्तम कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi सपोर्ट देखील देण्यात आले आहे.

JioMotive सोबत मिळतेय खास ऑफर

रिलायन्स जिओकडून मर्यादित कालावधीची ऑफरही जाहीर करण्यात आली आहे. JioMotive पहिल्या वर्षासाठी मोफत आहे. मात्र, एक वर्षानंतर ग्राहकांना वर्षाला 599 रुपये द्यावे लागतील. आत्तासाठी, हा कार ट्रॅकर 10% ऑफरसह रिलायन्स डिजिटल वेबसाइटवर सूचीबद्ध आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :