JioVoot : नवीन OTT प्लॅटफॉर्म येणार ? Netflix-Hotstarची होणार का सुट्टी ?

Updated on 28-Apr-2023
HIGHLIGHTS

JioCinema चे नाव बदलून JioVoot करण्यात येणार आहे.

IPL 2023 नंतर नाव बदलण्याची योजना

JioVoot सुपर प्लॅन नावाचा सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच होईल.

सध्या OTT विश्वात एक नवीन चर्चा रंगली आहे. JIO आपल्या OTT प्लॅटफॉर्मद्वारे बाजारातील उपलब्ध OTT प्लॅटफॉर्म्सना टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनी लवकरच JioVoot नावाचे OTT ऍप आणणार आहे. मात्र, आम्ही तुम्हाला सांगतो की,  JioVoot हे नवे OTT प्लॅटफॉर्म नाही तर पूर्वीपासून उपलब्ध JioCinema चे फक्त नाव बदलण्यात येणार आहे. 

JioCinema चे नाव बदलणार

सध्या ऍप IPL 2023 चे सामने सुरु आहेत. क्रिकेट लव्हर्सचा नेहमीप्रमाणेच या सीजनलाही भरभरून प्रतिसाद मिळतोय. वृत्तानुसार, IPL चा शेवटचा सामना 28 मे 2023 रोजी खेळला जाणार आहे. त्यानंतर, कंपनी आपल्या OTT ऍपचे नाव बदलेल अशी माहिती मिळाली आहे. त्यासोबतच नवीन सब्सक्रिप्शन देखील जोडले जाणार आहे.

सब्स्क्रिप्शन प्लॅनची  किंमत 99 रुपये

 अलीकडेच, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वतीने मीडिया आणि बिझनेसच्या अध्यक्षा ज्योती देशपांडे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, "JioCinema मध्ये लवकरच मोठे बदल होणार आहेत." मिळालेल्या माहितीनुसार, JioVoot सुपर प्लॅन नावाचा सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच होईल. या प्लॅनची किंमत फक्त 99 रुपये इतकी असणार आहे. मात्र, कंपनीने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. 

लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म्स जसे की, Netflix, Prime Video आणि हॉटस्टार सारख्या प्लॅटफॉर्म्सना चांगलीच स्पर्धा देण्यासाठी JIO सज्ज झाली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Netflix च्या सब्सक्रिप्शन प्लॅनची सुरुवातीची किंमत 149 रुपये इतकी आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :