JioCinema लवकरच मोफत प्लॅटफॉर्मवरून सशुल्क सबस्क्रिप्शन प्लॅटफॉर्मवर बदलणार आहे. या नव्या बदलासह प्लॅटफॉर्मचे नाव देखील JioVoot ठेवण्यात येणार आहे. IPL 2023 नंतरच हा बदल लागू होणार असल्याची माहिती मिळत आहे. JioCinema च्या सबस्क्रिप्शन प्लॅनची चर्चा मागील काही दिवसांपासून जोरात सुरु आहे. दरम्यान, तीन JioCinema सबस्क्रिप्शन प्लॅन्स देखील इंटरनेटवर लीक झाले आहेत.
या तिन्ही प्लॅनमध्ये एक दैनिक, एक त्रैमासिक आणि वार्षिक प्लॅन समोर आली आहे. हे सर्व तपशील u/Economy_Protection_7 नावाच्या Reddit वापरकर्त्याने उघड केले आहेत.
JioCinema Daily : नावाप्रमाणेच हा प्लॅन फक्त एका दिवसाच्या वापरासाठी आहे. त्याची किंमत 2 रुपयांपेक्षा कमी आहे. हे प्लॅन तुम्हाला या किमतीत प्रास्ताविक ऑफर म्हणून उपलब्ध होणार आहे. नंतर त्याची खरी किंमत एका दिवसासाठी 29 रुपये आहे.
JioCinema Gold : या श्रेणीतील पुढील प्लॅन JioCinema Gold आहे. हा प्लॅन तीन महिन्यांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनची लाँच किंमत 99 रुपये आहे. तर त्याची खरी किंमत 299 रुपये असणार आहे.
JioCinema Platinum : तिसरा प्लॅन JioCinema Platinum आहे, जो 12 महिन्यांसाठी म्हणजेच एका वर्षासाठी येतो. त्याची प्लॅनची मूळ किंमत 1,199 रुपये आहे, परंतु तुम्हाला हा प्लॅन सुरुवातीला 599 रुपयांना मिळणार आहे.
वरील सर्व प्लॅन्ससह JioCinema इतर लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म्सना उदा. नेटफ्लिक्स, हॉटस्टार इ. प्लॅटफॉर्म्सना चांगलीच स्पर्धा मिळणार आहे.