JioCinema आणि Netflix: अनलिमिटेड फ्री कंटेंट देण्यासाठी कोणाचा प्लॅन आहे बेस्ट?

JioCinema आणि Netflix: अनलिमिटेड फ्री कंटेंट देण्यासाठी कोणाचा प्लॅन आहे बेस्ट?
HIGHLIGHTS

JioCinema ने आपले प्रीमियम सब्स्क्रिप्शन प्लॅन सादर केला आहे.

या प्लॅनची वैधता एकूण 12 महिन्यांची आहे.

Netflix च्या मोबाईल मंथली प्लॅनची किमंत 149 रुपये

JioCinema ने भारतात अलीकडेच आपला वार्षिक प्लॅन सादर केला आहे. JioCinema वर सध्या क्रिकेट चाहते IPL 2023 चा भरभरून लाभ घेत आहेत. JioCinema चा प्रीमियम प्लॅनची किंमत 999 रूपये आहे. त्यामुळे इतर लोकप्रिय आणि प्रसिध्द OTT प्लॅटफॉर्मला JioCinema चांगलीच स्पर्धा देणार आहे, यात काही शंका नाही. आज या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला JioCinema आणि Netflix च्या सबस्क्रिप्शन प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत.

JioCinema सब्स्क्रिप्शन प्लॅन 

नुकतेच JioCinema ने आपले प्रीमियम सब्स्क्रिप्शन प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनची किमंत  999 रूपये आहे, तर या प्लॅनची वैधता एकूण 12 महिन्यांची आहे. या प्रीमियम प्लॅनसह यूजर स्मार्टफोन, टॅबलेट किंवा TV इ. वर कंटेंट बघू शकतात. म्हणजेच युजर्स चार डिवाइसवर कंटेंट स्ट्रीम करू शकतात. या प्लॅनसह युजर्स 4K रिझोल्युशन पर्यंत व्हीडिओ बघू शकतात. 

Netflix सब्स्क्रिप्शन प्लॅन 

Netflix च्या मोबाईल मंथली प्लॅनची किमंत 149 रुपये आहे. ज्यामध्ये फक्त एका मोबाईलवर कंटेंट पाहता येणार आहे. तर बेसिक मंथली प्लॅनची किंमत 199 रुपये इतकी आहे. यामध्ये युजर कुठल्याही डिवाइसवर कंटेंट बघू शकतात. ,तर, एका वेळी एकाच डिवाइसवर कंटेंट बघता येईल.  

त्याबरोबरच, स्टॅंडर्ड प्लॅनसाठी युजर्सना 499 रुपये द्यावे लागतील. या प्लॅनसह HD रिसोल्युशनसह कंटेंट ऑफर केला जातो. तर, प्रीमियम मंथली प्लॅन साठी युजर्सना 649 रुपये देण्याची गरज आहे. या प्लॅनमध्ये युजर्स एकाच वेळी चार डिवाइसवर कंटेंट बघू शकतात. या प्लॅनसह युजर्स 4K रिझोल्युशन पर्यंत व्हीडिओ बघण्यास सक्षम असतील. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo