भारतातील सर्वात श्रीमंत दिग्गजांपैकी एक Mueksh Ambnai यांच्या मालकीच्या JioCinema या कंपनीने काही काळापूर्वी नवीन प्रीमियम प्लॅन लाँच करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर, आज म्हणजेच 25 एप्रिल रोजी जिओ सिनेमाने दोन नवीन प्लॅन सादर केले आहेत. कंपनीच्या पहिल्या नव्या प्लॅनचे नाव ‘Premium’ आहे, ज्याची किंमत 59 रुपये आहे. तर दुसऱ्या प्लॅनचे नाव ‘Family’ असे ठेवण्यात आली आहे, ज्याची किंमत 149 रुपये आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता नव्या प्लॅनबद्दल संपूर्ण माहिती बघुयात-
हे सुद्धा वाचा: जगभरात फिरणाऱ्या ग्राहकांसाठी Airtel ने लाँच केला नवा Affordable इंटरनॅशनल रोमिंग प्लॅन, बघा बेनिफिट्स। Tech News
JioCinema Premium प्लॅनची किंमत वर सांगितल्याप्रमाणे 59 रुपये आहे. मात्र, कंपनी विशेष ऑफर अंतर्गत प्रीमियम प्लॅनवर 51% सूट देत आहे. त्यासह या प्लॅनची किंमत फक्त 29 रुपये प्रति महिना आहे. त्याबरोबरच या प्लॅनद्वारे यूजर्सना अनेक फायदे मिळतील. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, स्पोर्ट्स आणि लाइव्ह कंटेंट व्यतिरिक्त, प्लॅनमध्ये ऍड-फ्री कंटेंट उपलब्ध असेल.
त्याबरोबरच, या प्लॅन अंतर्गत यूजर्सना सर्व प्रीमियम कंटेंट बघायला मिळेल. प्लॅनद्वारे, वापरकर्ते एकाच वेळी सर्व प्रीमियम कंटेंट एकाच डिव्हाइसवर पाहू शकतील. तसेच यासह या वापरकर्ते 4K पर्यंत सर्व प्रीमियम कंटेंटचा आनंद घेता येईल. यामध्ये युजर्स JioCinema वर उपलब्ध असलेला सर्व कंटेंट कधीही डाउनलोड करून बघू शकतात.
JioCinema Family प्लॅनची किंमत 149 रुपये प्रति महिना आहे. तर, कंपनीने या प्लॅनवर 40% सूट दिली आहे, ज्यामुळे या प्लॅनची किंमत 89 रुपये प्रति महिना इतकी आहे. तसेच, या प्लॅनसह वापरकर्त्यांना फक्त 59 रुपयांचे फायदे मिळतील. मात्र, या प्लॅनमध्ये आणि प्रीमियम प्लॅनमध्ये एक फरक आहे की यामध्ये, वापरकर्त्यांना सर्व प्रीमियम कंटेंट एकाच वेळी तब्बल 4 डिव्हाइसवर पाहण्याचा लाभ मिळणार आहे.