मुकेश अंबानी JioCinema बंद करणार आहेत. खरं तर, मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स Jio ने Disney+ Hotstar विकत घेतले आहे. यानंतर, JioCinema लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar मध्ये विलीन होईल. Hotstar मध्ये JioCinema च्या विलीनीकरणानंतर ते भारतातील सर्वात मोठे OTT प्लॅटफॉर्म असेल, असा चर्चा सुरु आहेत. कारण JioCinema आणि Disney+ Hotstar दोन्ही OTT ॲप्सचा मोठ्या प्रमाणात युजर बेस आहे.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Reliance’s Viacom18 आणि Star India यांच्यातील विलीनीकरण आता अंतिम टप्प्यात आहे. याबाबत बातम्या देखील पुढे येऊ लागल्या आहेत. हे विलीनीकरण Disney+ Hotstar आणि Jio सिनेमा एकत्र करेल. वर सांगितल्याप्रमाणे, यामुळे तो भारताचा सर्वात मोठा OTT प्लेयर बनेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, या विलीनीकरणानंतर जिओकडे एकूण 100 चॅनेल असू शकतात.
Also Read: 500 रुपयांअंतर्गत Airtel चा बेस्ट प्लॅन! मिळतील 22 पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन Free
Reliance आणि वॉल्ट डिस्ने यांनी फेब्रुवारीमध्ये Viacom18 आणि Star यांच्या विलीनीकरणाच्या करारावर स्वाक्षरी केली होती. विलीनीकरणानंतर, कंपनी 100 हून अधिक चॅनेल आणि दोन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म चालवणार आहे. महत्त्वाचे म्हणजे अहवालानुसार या दोन्ही OTT प्लॅटफॉर्मच्या विलीनीकरणासाठी $8.5 अब्ज म्हणजेच सुमारे 71 हजार कोटी रुपये किमतीचा करार करण्यात आला आहे.
यापूर्वी Viacom18 ने त्याचे इतर OTT प्लॅटफॉर्म Voot चे Jio Cinema मध्ये विलीनीकरण केले होते. आता Disney+ Hotstar आणि जिओ सिनेमामध्येही असेच काही घडणार आहे. यामध्ये तुम्हाला मनोरंजनासोबतच वेगवेगळे स्पोर्ट्स शो सुद्धा पाहायला मिळतील. म्हणजे फक्त मनोरंजन आणि गेमिंगसाठी हा एक मोठा OTT प्लॅटफॉर्म असेल.
जर आपण दोन्ही कंपन्यांच्या युजरबेसबद्दल बोललो तर, Disney+ Hotstar चे सुमारे 50 कोटी अधिक वापरकर्ते आहेत, तर JioCinema चे 10 कोटींहून अधिक वापरकर्ते उपलब्ध आहेत. वर सांगितल्याप्रमाणे, हा करार सुमारे 8.5 अब्ज डॉलर्समध्ये झाला आहे. अहवालानुसार, JioCinema चे मासिक सरासरी वापरकर्ते 22.5 कोटी आहेत. तर, Disney+ Hotstar च्या मासिक सक्रिय वापरकर्त्यांची संख्या 33.3 कोटी इतकी आहे.
यापूर्वी कंपनीने खेळ आणि मनोरंजनासाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म चालवण्याबाबत सांगितले होते. पण नंतर एकाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर दोन्ही चालवण्याचा मुद्दा पुढे आला आहे. सर्व कंटेंट आता Disney+ Hotstar या एकाच प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केला जाईल. कंपनीने स्वतःच्या JioCinema ऐवजी Disney+ Hotstar हे प्राथमिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म म्हणून ठेवण्याचा निर्णय का घेतला याची कारणे देखील देण्यात आली आहेत.
अहवालानुसार, Disney+ Hotstar च्या मजबूत तांत्रिक पायामुळे मोठ्या प्रमाणावर थेट आणि सहजतेने लाइव्ह स्ट्रीमिंग हाताळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक दर्जाचे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म तयार करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे जेथे खेळापासून मनोरंजनापर्यंत सर्व काही उपलब्ध असेल.