digit zero1 awards

आता घरबसल्या मोबाईलवर सर्व TV चॅनेल मोफत, JIO वर उपलब्ध खास ऑफर

आता घरबसल्या मोबाईलवर सर्व TV चॅनेल मोफत, JIO वर उपलब्ध खास ऑफर
HIGHLIGHTS

JIO नेहमीच मोफतमध्ये ग्राहकांच्या मनोरंजनासाठी सज्ज असते.

तुमच्या स्मार्टफोनवर मोफत बघा सर्व टिव्ही चॅनेल्स

कंपनी 15 पेक्षा जास्त भाषांमध्ये टीव्ही चॅनेल ऑफर करते.

पूर्वी लोक केबल कनेक्शनद्वारे टीव्ही पाहत असत, आता त्याची जागा डायरेक्ट टू होम DTH सेवेने घेतली आहे. त्यानंतर, आता लोकांनी मनोरंजनासाठी Netflix आणि Amazon सारख्या OTT प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. तर, आता वापरकर्त्यांना टीव्ही चॅनेल पाहण्यासाठी केबल कनेक्शन किंवा DTH ची आवश्यकता नाही. वापरकर्ते कोणतेही पैसे न भरता सर्व टीव्ही चॅनेल मोबाईलवर पूर्णपणे विनामूल्य पाहू शकतात. रिलायन्स जिओ आपल्या वापरकर्त्यांना ही सेवा प्रदान करेल.

हे सुद्धा वाचा : इंस्टाग्रामने आणले Quiet Mode फीचर, आता तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करू शकणार नाही

रिलायन्स जिओ यूजर्स कंपनीच्या या ऑफरचा फायदा घेऊ शकतात. खास गोष्ट म्हणजे जुन्या चॅनेलशिवाय तुम्ही नवीन चॅनेलही पाहू शकता, तेही अगदी मोफत. याशिवाय तुम्ही न्यूज चॅनेलही मोफत पाहू शकता. हे सर्व चॅनेल पाहण्यासाठी तुम्हाला कोणतेही वेगळे शुल्क द्यावे लागणार नाही. जिओची ही सेवा केवळ त्याच्या वापरकर्त्यांसाठी आहे.

असे पहा मोफत चॅनेल 

मोफत टीव्ही चॅनेल पाहण्यासाठी तुम्हाला वेगळे रिचार्ज करण्याची गरज नाही. यासाठी तुम्हाला फक्त My Jio App स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करावे लागेल. तुम्ही कोणतेही टीव्ही चॅनल पहा, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, परंतु डेटा नक्कीच खर्च होईल. म्हणजेच युजर्सना मोफत टीव्ही चॅनेल पाहण्यासाठी इंटरनेट सुविधा असली पाहिजे, तरच तुम्ही तुमचे आवडते चॅनेल मोफत पाहू शकाल.

जिओवर उपस्थित असलेले टीव्ही चॅनेल पाहण्यासाठी जिओ टीव्ही ऍपची मदत घ्यावी लागेल. या ऍपवर तुम्ही विविध प्रकारचे टीव्ही चॅनेल पाहू शकाल. मात्र, काही सशुल्क चॅनेल आहेत ज्यासाठी वापरकर्त्यांना शुल्क द्यावे लागेल. तुम्हाला लाइव्ह चॅनेल मोफत पाहण्याचा आनंद घ्यायचा असेल, तर येथे नमूद केलेली पद्धत नक्कीच वापरून पहा.

तुम्ही जिओ यूजर असाल तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. जिओचा नंबर चालवणारे वापरकर्ते त्यांच्या स्मार्टफोनवर 200 हून अधिक HD चॅनेलसह 950 हून अधिक टीव्ही चॅनेल पाहू शकतात. याशिवाय कंपनी कधीही हे चॅनेल पाहण्याची सुविधा देते. वापरकर्ते HD चॅनेलवर चित्रपट, खेळ, क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, बातम्या इ. पाहू शकतात. कंपनी 15 पेक्षा जास्त भाषांमध्ये टीव्ही चॅनेल ऑफर करते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo