Jio Cinema च्या या प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लॅनची किंमत एकूण 999 रुपये
या प्लॅनची वैधता एका वर्षाची आहे.
म्हाला एकाच वेळी 4 डिव्हाइसवर स्ट्रीमिंगचा आनंद घेता येईल.
Jio ने अखेर Jio Cinema premium subscription प्लॅन लाँच केले आहे. या प्लॅन्सबद्दल मागील काही दिवसांपासून बरीच चर्चा सुरु आहे. तुम्हाला माहितीच आहे की, Jio Cinema, FIFA विश्वचषक आणि IPL 2023 चे विनामूल्य स्ट्रीमिंग ऑफर करणारा लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे. पण आता याचे सुब्स्क्रिप्शन प्लॅन लाँच झाले आहेत. चला बघुयात नव्या प्लॅन्सची किंमत –
Jio Cinema premium subscription प्लॅन्स
Jio Cinema च्या या प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लॅनची किंमत एकूण 999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा Jio सिनेमाचा वार्षिक प्लॅन आहे. याद्वारे तुम्ही कोणत्याही डिव्हाइसवर हाय कॉलिटी व्हिडिओ आणि ऑडिओमध्ये हॉलीवूड कंटेंट पाहण्यास आणि ऐकण्यास सक्षम असाल.
प्लॅनमधील इतर फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, तो म्हणजे तुम्हाला एकाच वेळी 4 डिव्हाइसवर स्ट्रीमिंगचा आनंद घेता येईल.
कसे घेता येईल प्लॅन ?
तुम्हालाही Jio सिनेमाचा हा प्रीमियम प्लॅन घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला Jio सिनेमाच्या अधिकृत साइट किंवा ऍपवर जावे लागेल.
-यानंतर तुम्हाला सबस्क्राईब करण्याचा ऑप्शन स्क्रीनवर दिसेल.
– तुम्ही या पर्यायावर क्लिक केले तर, सबस्क्रिप्शन पेज ओपन होईल.
– जर तुम्हाला हा प्लान खरेदी करायचा असेल तर तुम्हाला Continue वर क्लिक करा.
– तुम्हाला डेबिट, क्रेडिट किंवा UPI द्वारे पेमेंट करता येईल.
सबस्क्रिप्शन खरेदी केल्यानंतर, तुम्ही HBO शो आणि WB चित्रपट इत्यादींचा आनंद घेऊ शकणार आहात. या प्लॅनची वैधता एका वर्षाची आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.