विजय सेतुपतींनी घेतली ‘Jawan’ ची एवढी फी! बघा शाहरुखच्या आगामी चित्रपटाचे एकूण बजेट

Updated on 29-Aug-2022
HIGHLIGHTS

शाहरुख खानच्या आगामी चित्रपटात विजय सेतुपती असणार खलनायक

विजयने चित्रपटासाठी घेतले तब्बल 21 कोटी रुपये

शाहरुखच्या 'जवान' चित्रपटाचे बजेट 300 कोटी

सुपरस्टार शाहरुख खानच्या आगामी 'जवान' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. घोषणा झाल्यापासून हा चित्रपट सतत चर्चेत आहे. त्याबरोबरच, प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती या चित्रपटात असल्याच्या बातमीने आणखीनच खळबळ उडाली आहे. अलीकडच्या बातम्यांनुसार, विजय सेतुपती चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत आहे. पण यासाठी त्यांनी किती फी घेतली याबाबत तुम्हाला माहिती आहे का?

हे सुद्धा वाचा : JioPhone 5G आज सादर होण्याची शक्यता, 5G सेवेबाबतही होऊ शकते मोठी घोषणा

'जवान'साठी तब्बल 21 कोटी रुपये घेणार विजय

 
एका रिपोर्टनुसार, विजय सेतुपती या चित्रपटासाठी त्याची आतापर्यंतची सर्वाधिक फी घेत आहेत. 'विक्रम'मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या विजय सेतुपतीने तेव्हा 15 कोटी रुपये फी घेतली होती. पण या चित्रपटासाठी त्याने आपली फी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, तो 'जवान'साठी तब्बल 21 कोटी रुपये फी घेणार आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट 300 कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

विजयने 2 मोठे चित्रपट सोडले

एका रिपोर्टनुसार, विजय सेतुपतीने शाहरुख खानच्या जवान या चित्रपटात काम करण्यासाठी 2 मोठे ऍक्शन चित्रपट रिजेक्ट केले आहेत. असे बोलले जात आहे की, शाहरुख खानच्या चित्रपटातील त्याची भूमिका इतकी दमदार आहे की, त्याला हे दोन्ही चित्रपट सोडताना कोणतीही अडचण आली नाही. यानंतर आता चित्रपटातील त्याचा लूक पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

राणा दग्गुबती साकारणार होते खलनायकाची भूमिका

आत्तापर्यंत 'जवान' चित्रपटातून फक्त शाहरुख खानचा लूक शेअर करण्यात आला आहे. टीझरचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. प्रसिद्ध दिग्दर्शक एटली या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. याआधी राणा दग्गुबतीला या चित्रपटात खलनायकाची भूमिका करण्यास सांगण्यात आले होते, परंतु त्यांनी नकार दिल्यानंतर विजयला यासाठी फायनल करण्यात आले.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :