Happy Janmashtami 2024: कृष्ण जन्माष्टमीला प्रियजनांना द्या ‘या’ सुंदर शुभेच्छा, WhatsApp ला ठेवा अप्रतिम Status आणि Video
आज म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे.
WhatsApp द्वारे तुमच्या प्रयोजनांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा द्या.
तुम्ही WhatsApp ला पुढीलप्रमाणे स्टेटस आणि व्हीडिओ ठेऊनही शुभेच्छा देऊ शकता.
Happy Janmashtami 2024: ‘कृष्णा….मनमोहना म्होरे कान्हा म्होरे कृष्णा’ कृष्णभक्तांना ज्या सणाची मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा असते. तो सण म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी होय. जन्माष्टमीचा सण सर्व भक्तगण दरवर्षी भगवान कृष्णाच्या जन्माच्या निमित्ताने साजरा करतात. यंदाही आज म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. या जन्माष्टमीला आपल्या प्रियजनांना इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp द्वारे पुढील शुभेच्छा द्या.
WhatsApp ला जन्माष्टमीच्या पुढीलप्रमाणे शुभेच्छा द्या.
- श्री कृष्णाच्या जन्माच्या पावन दिवशी, आपल्या जीवनात प्रेम आणि आनंदाच्या रंगांची भरपूर छटा असो. कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
- श्री कृष्णाच्या आशीर्वादाने, आपल्या घरात सदा सुख, समृद्धी आणि प्रेमाचा वास असो. कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
- कृष्णाच्या जन्मोत्सवाच्या दिवशी, आपल्याला सर्व अडचणींवर मात करून सुख आणि समृद्धी प्राप्त होवो. कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
- श्री कृष्णाच्या दिव्य कृपेने, आपले जीवन सुखद आणि आनंदमय होवो. कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
- श्री कृष्णाच्या आशीर्वादाने, आपल्या जीवनात प्रत्येक दिवशी आनंद आणि प्रेम असो. कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
WhatsApp ला जन्माष्टमीचे Status ठेवा.
- श्री कृष्णाच्या पवित्र चरणात सच्च्या भक्तीची आणि प्रेमाची सोबत लाभो. जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
- कृष्णाच्या या पावन दिनी आपल्या जीवनात प्रेम, शांती आणि समृद्धीचा संचार होवो. जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.
- श्री कृष्णच्या आशीर्वादाने आपले जीवन आनंदी आणि परिपूर्ण होवो. जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
- कृष्णाच्या दिव्य लीलांपासून प्रेरित होऊन, आपले जीवन आनंदी आणि समृद्ध होवो. जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
- श्री कृष्णाच्या शुभाशीर्वादाने आपल्या घरात सुख, शांती आणि प्रेमाची भरपूर वाढ होवो. जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.
WhatsApp ला स्टेटस ठेवण्यासाठी जन्माष्टमी निमित्त Video कसे डाउनलोड कराल?
जन्माष्टमीला सोशल मीडियावर इंस्टाग्राम फेसबुक तसेच यु-ट्यूबवर जन्माष्टमीनिमित्त अनेक व्हीडिओ, शॉर्ट्स आणि रील्स वायरल होत आहेत. तुम्हाला देखील हे व्हीडिओ, रील्स किंवा शॉर्ट्स व्हीडिओ डाउनलोड करून WhatsApp स्टेटसला ठेवायचे असतील. तर, पुढील प्रक्रिया फॉलो करा:
- सर्वप्रथम तुम्हला सोशल मीडियावरील तुम्हाला आवडलेल्या Video वर जा.
- त्यानंतर, या Video ची लिंक कॉपी करा.
- आता, गुगल सर्च वर जाऊन ‘इंस्टाग्राम/ यु-ट्यूब व्हीडिओ डाउनलोड’ सर्च करा.
- यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर अनेक साईट्स दिसतील, ज्यावर तुम्ही संबंधित Video ची लिंक पेस्ट करून हे व्हीडिओ मोफतमध्ये डाऊनलोड करू शकता.
अशाप्रकारे वरील सोप्या प्रक्रियेद्वारे व्हीडिओ डाउनलोड केल्यानंतर, तुम्ही हा व्हीडिओ फोनच्या गॅलरीमधून WhatsApp स्टेटसला सहज ठेऊ शकता.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile