चित्रपट 15 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार
जितेंद्र कुमार आणि आरुषी शर्मा अभिनित 'जादुगर' या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी रिलीज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच आकर्षक आणि उत्साह निर्माण करणारा आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहून असे म्हणता येईल की, जितेंद्र कुमार आणि आरुषी शर्माची जोडी लोकांना खूपच आवडली आहे. हा चित्रपट 15 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.
'जादूगर' चित्रपट एक स्पोर्ट्स कॉमेडी ड्रामा आहे. जो एक मीनू नावाच्या स्ट्रगलिंग मॅजिशियनच्या प्रेमकथेचे वर्णन करतो. मीनूला खेळात रस नाही, त्याला शिक्षण घेऊन जादू करायचे आहे. पण तो एक लायक मुलगा आहे, हे सिद्ध करण्यासाठी त्याला कॉलोनीतील फुटबॉल मॅचमध्ये भाग घेण्यास भाग पाडले जाते. चित्रपटाचा ट्रेलर खूप जबरदस्त आहे, असे दिसून येते.
जिंतेद्रची 'पंचायत' वेब सिरीज
जितेंद्र कुमारची 'पंचायत' ही वेबसिरीज अलीकडे खूप चर्चेत राहिली आहे. Amazon Prime Video च्या या वेब सीरिजमध्ये त्याने अभिषेक त्रिपाठीची भूमिका साकारली होती. पंचायत सिरीज सुपरहिट झाल्यानंतर नेटफ्लिक्सने 'जादुगर' या चित्रपटाची घोषणाही केली, ज्यामध्ये जीतेंद्र मुख्य भूमिकेत आहे. ट्रेलरनंतर आता प्रेक्षकांना चित्रपटाची प्रतीक्षा आहे.
याव्यतिरिक्त, जितेंद्र कुमारने Shubh Mangal Zyada Saavdhan या चित्रपटात समलिंगी मुलाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला आणि लोकांना जितेंद्रची आयुष्मान खुरानासोबतची जोडी आवडली. याशिवाय जितेंद्रने Shuruaat Ka Interval, Gone Kesh आणि Chaman Bahaar यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.