Ariane-5 चे शानदार प्रदर्शन, ISRO GSAT-11 झाला यशस्वीरीत्या लॉन्च

Updated on 05-Dec-2018
HIGHLIGHTS

भारताचा सर्वोत्कृष्ट कम्युनिकेशन सॅटेलाईट GSAT-11 यशस्वीरीत्या लॉन्च झाला आहे. देशाच्या स्पेस एजेंसी इसरो ने हि माहिती दिली आहे की कम्युनिकेशन सॅटेलाईट ऑर्बिट मध्ये पोचला आहे.

भारताची स्पेस एजेंसी Indian Space Research Organisation (ISRO) ने आपल्या ट्विटर हँडल वरून हि माहिती दिली आहे की आज भारताचा सर्वोत्कृष्ट कम्युनिकेशन सॅटेलाईट GSAT-11 यशस्वीरीत्या आपल्या ऑर्बिट मध्ये पोचला आहे. सॅटेलाईट GSAT-11 Arianespace च्या Ariane-5 राकेट च्या माध्यमातून French Guiana इथून लॉन्च केला गेला आहे. इसरो नुसार कम्युनिकेशन सॅटेलाईट GSAT-11 चे वजन 5,854 kg आहे. या यशस्वी लॉन्च नंतर सॅटेलाईट ने Geosynchronous Transfer Orbit मध्ये प्रवेश केला आहे. यानंतर आता सॅटेलाईटची ऑन-बोर्ड मोटर फायर करून geostationary orbit मध्ये पाठवला जाईल.  

https://twitter.com/isro/status/1070152224997687298?ref_src=twsrc%5Etfw

जवळपास 1,174 कोटी रुपयांच्या या कम्युनिकेशन सॅटेलाईट च्या माध्यमातून डिजिटल इंडियाच्या BharatNet प्रोजेक्ट अंतर्गत वॉइस आणि वीडियो स्ट्रीमिंग बूस्ट केली जाईल. इसरो चेयरमन K Sivan यांनी सांगितले की देशातील छोटी गावे आणि शहरे या मोठ्या कम्युनिकेशन सॅटेलाईट ने जोडली जातील. GSAT-11 BharatNet ला सपोर्ट करेल ज्यामुळे इ-गव्हर्नन्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स वर ग्राम पंचायतिचा पण समावेश होईल. यामुळे VSAT टर्मिनल्स अजून एंटरप्राइज नेटवर्क साठी कंज्यूमर ब्रॉडबँड ऍप्लिकेशन्स सोबत पण जोडला जाईल.

इसरो नुसार GSAT-11 एडवांस कम्युनिकेशन सॅटेलाईट मधील एक चांगली सुरवात आहे असे म्हणता येईल ज्याच्या मध्यमातून इंडियन मेनलँड आणि आईलँड्स वर मल्टी-स्पॉट बीम एंटीना कवरेज सहज करत येईल. या सॅटेलाईटची मिशन लाइफ 15 वर्ष आहे. सोबतच यात 32 यूजर बीम्स (Ku band) आणि 8 हब बीम्स (Ka band) तसेच 16 Gbps डेटा रेट आहे. विशेष म्हणजे इसरो नुसार हा कम्युनिकेशन सॅटेलाईट GSAT-11 देशातील ब्रॉडबँड सर्विसेस अजून चांगल्या करायला मदत करेल. त्याचबरोबर नवीन जनरेशनच्या ऍप्लिकेशन्स साठी पण हा उपयोगी पडेल.

एप्रिल 2018 मध्ये K Sivan यांच्या नेतृत्वात याच ठिकाणाहून या कम्युनिकेशन सॅटेलाईट GSAT-11 च्या परफॉरमेंस साठी काही चाचण्या करण्यात आल्या होत्या. GSAT-11 मे 2018 मध्ये लॉन्च करण्याची तयारी करण्यात आली होती पण काही चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या. असे करण्यामागचे कारण म्हणजे GSAT-6A चे अपयश आहे असे बोलले जात आहे. त्याचमुळे काही चाचण्यांसह GSAT-11 डबल चेक करणे बाकी होते. ISRO नुसार GSAT-6A च्या अपयशाचे कारण कम्युनिकेशन लॉस हे होते.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :