Ariane-5 चे शानदार प्रदर्शन, ISRO GSAT-11 झाला यशस्वीरीत्या लॉन्च
भारताचा सर्वोत्कृष्ट कम्युनिकेशन सॅटेलाईट GSAT-11 यशस्वीरीत्या लॉन्च झाला आहे. देशाच्या स्पेस एजेंसी इसरो ने हि माहिती दिली आहे की कम्युनिकेशन सॅटेलाईट ऑर्बिट मध्ये पोचला आहे.
भारताची स्पेस एजेंसी Indian Space Research Organisation (ISRO) ने आपल्या ट्विटर हँडल वरून हि माहिती दिली आहे की आज भारताचा सर्वोत्कृष्ट कम्युनिकेशन सॅटेलाईट GSAT-11 यशस्वीरीत्या आपल्या ऑर्बिट मध्ये पोचला आहे. सॅटेलाईट GSAT-11 Arianespace च्या Ariane-5 राकेट च्या माध्यमातून French Guiana इथून लॉन्च केला गेला आहे. इसरो नुसार कम्युनिकेशन सॅटेलाईट GSAT-11 चे वजन 5,854 kg आहे. या यशस्वी लॉन्च नंतर सॅटेलाईट ने Geosynchronous Transfer Orbit मध्ये प्रवेश केला आहे. यानंतर आता सॅटेलाईटची ऑन-बोर्ड मोटर फायर करून geostationary orbit मध्ये पाठवला जाईल.
Update #7#ISROMissions
"Succesful #GSAT11 mission acheived with big support from @Arianespace. Credit also for #TeamISRO," Dr K Sivan during his post-launch statement from Spaceport in French Guiana. pic.twitter.com/qjlzZ9oQQW
— ISRO (@isro) December 5, 2018
इसरो नुसार GSAT-11 एडवांस कम्युनिकेशन सॅटेलाईट मधील एक चांगली सुरवात आहे असे म्हणता येईल ज्याच्या मध्यमातून इंडियन मेनलँड आणि आईलँड्स वर मल्टी-स्पॉट बीम एंटीना कवरेज सहज करत येईल. या सॅटेलाईटची मिशन लाइफ 15 वर्ष आहे. सोबतच यात 32 यूजर बीम्स (Ku band) आणि 8 हब बीम्स (Ka band) तसेच 16 Gbps डेटा रेट आहे. विशेष म्हणजे इसरो नुसार हा कम्युनिकेशन सॅटेलाईट GSAT-11 देशातील ब्रॉडबँड सर्विसेस अजून चांगल्या करायला मदत करेल. त्याचबरोबर नवीन जनरेशनच्या ऍप्लिकेशन्स साठी पण हा उपयोगी पडेल.