Apple नवीनतम लाइनअप iPhone 14 मध्ये, कंपनीने सिनेमॅटोग्राफीवर लक्ष केंद्रित केले. आता यावर एक चित्रपटही शूट करण्यात आला आहे, जो You Tube मोफत पाहता येईल. हे चित्रपट आयफोन 14 प्रो वर चित्रीत करण्यात आले असून त्याचे नाव 'फुरसत' असल्याचे सांगितले जात आहे. फुरसत हा Appleने शेअर केलेला लघुपट आहे. विशाल भारद्वाज यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 3 फेब्रुवारीपासून YouTube वर पाहण्यास उपलब्ध आहे.
हे सुद्धा वाचा : Realme 10 Pro+ 5G Vs Redmi Note 12 Pro+ 5G : जाणून घ्या किंमत आणि फीचर्स…
Apple ने शेअर केलेली Fursat शॉर्ट फिल्म आयफोन 14 प्रो वरच शूट करण्यात आली होती, असे कंपनीने म्हटले आहे. या चित्रपटात ईशान खट्टर आणि वामिका गाबी मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट फक्त 30 मिनिटांचा आहे. या चित्रपटाची कथा एका पात्राची आहे ज्याला आपले भविष्य नियंत्रित करायचे आहे. तुम्ही हा चित्रपट येथे बघू शकता…
चित्रपटात, ईशान खट्टरच्या पात्राचे नाव निशांत आहे. जो भविष्य पाहू शकणारी प्राचीन वस्तू पकडतो, ज्याचे नाव 'दूरदर्शन' असते. दूरदर्शन त्याला त्याच्या आगामी काळाबद्दल सांगतो, हे जाणून घेतल्यानंतर निशांत त्यात खूप रस घेऊ लागतो आणि हे उपकरण कोणत्या तंत्रज्ञानाद्वारे भविष्य सांगते आहे, हे त्याला जाणून घ्यायचे असते.
कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच केलेल्या iPhone 14 Pro वर Fursat ही शॉर्ट फिल्म शूट करण्यात आली आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे. यात सेकंड जनरेशन सेन्सर शिफ्ट ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन पाहण्यास मिळते, ज्याच्या मदतीने फोन सर्वोत्तम व्हिडिओ कॅप्चर करू शकतो, असे कंपनीने सांगितले आहे. मुख्य लेन्ससह, यात 12-मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर देखील आहे आणि तिसरा सेन्सर म्हणून, 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा देखील देण्यात आला आहे.