iPhone 15 Launch: बहुप्रतिक्षित Apple Event मध्ये ‘हे’ जबरदस्त प्रोडक्ट्स होणार लाँच, बघा प्रत्येक डिटेल
Apple इव्हेंट वंडरलस्ट उद्या म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी रात्री 10:30 वाजता होणार आहे.
Apple च्या वार्षिक कार्यक्रमात नवीन iPhone 15 सिरीज, Apple Watch Series 9, AirPods Pro यासह अनेक प्रोडक्ट्स सादर केले जातील.
डायनॅमिक आयलंड डिस्प्ले फिचर देखील या वर्षी लाँच झालेल्या सर्व iPhone मध्ये मिळण्याची शक्यता
iPhone लव्हर्स! तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, आगामी iPhone सिरीजची आतुरतेने वाट पाहणाऱ्या ग्राहकांची प्रतीक्षा उद्या संपणार आहे. Apple Event ‘Wonderlust’ जागतिक स्तरावर उद्या म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. Apple च्या या मोठ्या वार्षिक कार्यक्रमात नवीन iPhone 15 सिरीज, Apple Watch Series 9, AirPods Pro यासह अनेक प्रोडक्ट्स सादर केले जातील. त्याबरोबरच, WWDC 2023 मध्ये सादर केलेल्या iOS 17, iPadOS 17, watchOS 10 आणि tvOS 17 ची लाँच डेट जाहीर केली जाईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता Apple इव्हेंटशी संबंधित प्रत्येक तपशील जाणून घ्या.
Apple Event
Apple इव्हेंट वंडरलस्ट उद्या म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी रात्री 10:30 वाजता होणार आहे. Apple च्या अधिकृत वेबसाइटवर तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि YouTube, Apple टीव्ही Appवर हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल.
Apple iPhone 15 सिरीज
या Apple इव्हेंटचे मुख्य आकर्षण नवीन iPhone 15 सिरीज असेल. Apple iPhone 15 सिरीजमध्ये चार नवीन iPhone सादर केले जाऊ शकतात. iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max ही डिवाइस लाँच होणार आहेत. मात्र, अनेक रिपोर्ट्सनुसार, iPhone 15 Pro Max हा iPhone 15 Ultra म्हणून सादर केला जाऊ शकतो.
संभावित तपशील
ही उपकरणे USB टाइप C चार्जिंग पोर्ट, अल्युमिनियम साइड्स आणि ग्लास बॅक पॅनेलसह येतील. या सीरीजच्या दोन्ही बेस मॉडेल्समध्ये A16 बायोनिक चिपसेट आढळू शकतो. फोनचे प्रो मॉडेल्स A17 बायोनिक चिपसेटसह येऊ शकतात. हे Apple उपकरण 48MP कॅमेरा सेटअपसह येऊ शकतात. मागील वर्षी चर्चेत असलेला डायनॅमिक आयलंड डिस्प्ले फिचर देखील या वर्षी लाँच झालेल्या सर्व iPhone मध्ये मिळण्याची शक्यता आहे.
AirPods Pro
यंदा Apple USB Type C चार्जिंग पोर्ट सपोर्टसह AirPods Pro लाँच करू शकतो. नवीन बड्स मागील वर्षी आलेल्या बड्स प्रो सारख्या फीचर्ससह येतील. या सिरीजमध्ये AirPods आणि AirPods Max सादर केले जाऊ शकतात. Apple च्या या ब्लूटूथ इअरबड्समध्ये नवीन कन्व्हर्सेशन अवेयरनेस फिचर देखील मिळण्याची शक्यता आहे.
Apple Watch
Apple वॉच 9 सिरीजमध्ये 41mm आणि 45mm अशा दोन डायल मिळू शकतात. याशिवाय Apple Watch Ultra 2B देखील सादर केला जाऊ शकतो. हे सर्व मागील वर्षी लाँच झालेल्या वॉच 8 सीरिज आणि वॉच अल्ट्रासारखे दिसतील. याशिवाय Apple Watch SE चे नवीन मॉडेल देखील लाँच होईल.
वरील सर्व तपशील लीक आणि काही रिपोर्ट्सनुसार मिळालेल्या माहितीवरून सांगण्यात आले आहेत. या उपकरणांबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile